बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत देणारी विशाल-शेखर यांची ओळख सर्वांनाच आहे. सध्या शेखर रवजियानी यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेखर यांनी ट्विटरवर एका बिलाचा फोटो शेअर केला आहे. या बिलामध्ये त्याच्याकडून तीन अंड्यांसाठी तब्बल १ हजार ६७२ रुपये आकारण्यात आल्याचं त्यानं सांगितलं. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
अभिनेता राहुल बोसनंतर शेखर रवजियानीला आता महागड्या बिलाचा फटका बसला आहे. शेखरनं त्याच्या ट्विटरवर एका पंचतारांकित हॉटेलच्या बिलाचा फोटो शेअर केला. यामध्ये त्याला ३ अंड्यांसाठी चक्क १ हजार ३५० रुपये मोजावे लागले. सोबतच कराची रक्कम धरुन एकूण बिल १ हजार ६७२ रुपये झालं. त्यामुळेच त्यानं हा फोटो शेअर केला.
Rs. 1672 for 3 egg whites???
— Shekhar Ravjianii (@ShekharRavjiani) November 14, 2019
That was an Eggxorbitant meal 🤯 pic.twitter.com/YJwHlBVoiR
यापूर्वी अभिनेता राहुल बॉसला चंदीगढमधील एका हॉटेलनं दोन केळ्यांसाठी चक्क ४४२ रुपये आकारले होते. या घटनेनंतर कार्तिक धर या व्यक्तीनंही ट्विटरवर एक पोस्ट करुन त्याला आलेला अनुभव शेअर केला होता. त्याच्याकडूनही एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन अंड्यांसाठी १ हजार ७०० रुपये आकारले होते.
हेही वाचा