राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि सुवर्णकमळप्राप्त ‘कासव’ या चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित या सिनेमात नक्की काय पाहायला मिळेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
इरावती हर्षे, आलोक राजवाडे, डॉ. मोहन आगाशे आणि किशोर कदम यांच्या दमदार अभिनयाने परिपूर्ण 'कासव' चित्रपटाची निर्मिती सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी केली आहे. तर डॉ. मोहन आगाशे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेला 'कासव' ६ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून वाहवा मिळवण्यासाठी मोठ्या पडद्यावर येत आहे.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)