Advertisement

मालाडमधील 7 समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवणार

किनारे स्वच्छ करण्यासाठी 1.62 कोटी खर्च करणार.

मालाडमधील 7 समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवणार
SHARES

मालाड (malad) किनाऱ्यावरील सात समुद्रकिनारे स्वच्छ (beach cleaning) करण्यासाठी पालिकेने (brihanmumbai municipal corporation) पुढाकार घेतला आहे. दररोज 20 कामगार आणि हेवी-ड्युटी बीच क्लिनिंग मशीन्स तैनात करण्यात येणार आहेत. यासाठी 45,000 इतका खर्च करण्यात येणार आहे.  

अक्सा, मार्वे, दानापानी, मढ, एरंगळ, सिल्व्हर आणि भाटी या सात समुद्रकिनाऱ्यांचा यात समावेश आहे. हे समुद्रकिनारे 8 किलोमीटर पर्यंत पसरले आहेत. पावसाळ्यात दररोज 6 ते 7 मेट्रिक टन कचरा येथे गोळा केला जातो. तर इतर हंगामात 3 ते 3.5 मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो.

महापालिकेने (bmc) 10.16 कोटी रुपये खर्च करुन 2021 पासून सहा वर्षांसाठी रक्षित इन्फ्रास्ट्रक्चरला काम दिले आहे. यावर्षी महापालिका मालाड किनारे स्वच्छ करण्यासाठी 1.62 कोटी रुपये खर्च करणार आहे. वाढत्या महागाईनुसार हा खर्च अधिक वाढण्याची शक्यता आहे.  

 अक्सा बीचला पर्यटक सर्वाधिक भेट देतात. वीकेंडला 5,000 पर्यटक येथे येतात. इतर समुद्रकिना-याप्रमाणे, अक्साला भरती-ओहोटीमुळे कचरा वाहून येतो. त्यामुळे पर्यटकांद्वारे होणारा कचरा आणि वाहून येणारा कचरा यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा आढळून येतो.

दाना पानी बीचवर त्याच्या वक्र आकारामुळे अधिक कचरा जमा होतो. खडकाळ भूभागामुळे महापालिकेच्या मशीन्सना प्रभावीपणे साफसफाई करणे कठीण होते.

मार्वे बीच लोकप्रिय आहे कारण ते मनोरी फेरीसाठी महत्त्वाचे आहे. या बीचवर कचरा, उरलेले मासे आणि समुद्रातील कचरा साचतो. समुद्रकिनारा सकाळी एकदा स्वच्छ केला जातो आणि बहुतेक स्वच्छता हाताने केली जाते.

एरंगळ, मढ, भाटी आणि सिल्व्हर बीचेस प्रामुख्याने मच्छिमार वापरतात. सिल्व्हर बीच त्याच्या वाळूमुळे अधिक लोकप्रिय आहे.

तसेच अक्सा बीचवर 2006 ते 2018 दरम्यान दरवर्षी सरासरी 38 मृत्यूंसह बुडण्याच्या घटनांचे प्रमाणही जास्त आहे. समुद्रकिनारा अनेकदा खवळलेला समुद्र आणि मुसळधार पावसामुळे बंद होतो. रात्री 8 च्या सुमारास बीच बंद होतो. सुरक्षेसाठी येथे गार्ड शिफ्टमध्ये काम करतात.



हेही वाचा

वाशी : धोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा बंद

चिंचपोकळी स्टेशनचा कायापालट होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा