Advertisement

आता IIT-Bombayचे 'हे' अॅप देणार हवामानाचा अंदाज

IIT-Bombay मधील दहा विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या टीमने ही प्रणाली विकसित केली आहे.

आता IIT-Bombayचे 'हे' अॅप देणार हवामानाचा अंदाज
SHARES

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT-B)च्या टीमने मुंबईसाठी हायपरलोकल हवामान अंदाज प्रणाली विकसित केली आहे. याच्या मदतीने विशिष्ट परिसर, रस्ते आणि भागांसाठी अचूक अंदाज देता येईल. एमसीजीएम सेंटर फॉर म्युनिसिपल कॅपेसिटी बिल्डिंग अँड रिसर्च (एमसीएमसीआर) च्या सहकार्याने हा प्रकल्प आता अँड्रॉइडवर मुंबई फ्लड ॲपद्वारे लोकांसाठी उपलब्ध आहे.

नवीन प्रणाली भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) कुलाबा, सांताक्रूझ आणि मरीन लाइन्समधील मुख्य वेधशाळा तसेच मुंबई आणि त्याच्या उपनगरातील 60 हून अधिक स्वयंचलित हवामान केंद्रे आणि पर्जन्य निरीक्षण केंद्रांमधील डेटा दर्शवेल.

अॅपच्या मदतीने पुढील 24 तासांसाठी प्रति तास पावसाचा अंदाज आणि पुढील तीन दिवसांसाठी दैनिक अंदाज दिला जाईल. IIT-Bombay मधील दहा विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या टीमने ही प्रणाली विकसित केली आहे.

हवामान अभ्यास कार्यक्रमाचे निमंत्रक सुबिमल घोष हिंदुस्थान टाईम्सला म्हणाले, "आम्ही आयआयटीबीमध्ये यासाठी एक मॉडेल विकसित केले आहे. आता हे ॲपद्वारे तसेच https://mumbaiflood.in/ या वेब पोर्टलवर लोकांसाठी उपलब्ध आहे."

हवामानाच्या अंदाजाव्यतिरिक्त, ॲप मिठी नदी आणि वाकोला नाला यांसारख्या ठिकाणी सेन्सरद्वारे पाण्याच्या पातळीच्या मोजमापांचा वापर करून नागरिकांना पूर सूचना देते.

"याशिवाय, ॲप केवळ नागरिकांचा डेटा गोळा करेल. ॲपवर कुठल्या भागात पाणी साचले आहे? किंवा कुठे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे?याबाबतची माहिती देण्यासाठी, आम्ही तरतूद केली आहे. या ॲपद्वारे वापरकर्ते लोकेशन, वापरकर्त्याची उंची आणि पाण्याची पातळी अपलोड करू शकतात. पाणी पातळी निवडण्याचे पर्याय आणि वापरकर्ते जेव्हा हा डेटा अपलोड करतात, तेव्हा तो ताबडतोब लोकांना उपलब्ध करून दिला जाईल,” घोष यांनी स्पष्ट केले.

सध्या फक्त अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. घोष यांनी सांगितले की, "मुंबईकरांसाठी बनवलेले हे ॲप आहे. आम्ही या ॲपद्वारे गोळा केलेली माहिती  सरकारी संस्थांना पुढील हंगामासाठी पूर व्यवस्थापन योजना तयार करण्यास मदत करेल."



हेही वाचा

Mumbai Rains: मुंबईकरांनो सावधान! 'या' आठवड्यात मुसळधार पावासाचा अंदाज">Mumbai Rains: मुंबईकरांनो सावधान! 'या' आठवड्यात मुसळधार पावासाचा अंदाज

फ्लेमिंगो तलाव जतन करण्याची महाराष्ट्र सरकारची योजना

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा