Advertisement

मुंबईत पावसाची विश्रांती, तापमानात काहीशी वाढ

मागील २४ तासात सांताक्रूझ वेधशाळेमध्ये ६ मिमी आणि कुलाबा इथं १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईत पावसाची विश्रांती, तापमानात काहीशी वाढ
SHARES

मागील आठवड्यात पावसाने मुंबईत तुफान हजेरी लावली होती. मुंबईच्या सखल भागात मुसळधार पावसामुळे गुडघाभर पाणी साचलं होतं. परंतु, रविवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळं मागील २४ तासात सांताक्रूझ वेधशाळेमध्ये ६ मिमी आणि कुलाबा इथं १ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

मुंबई उपनगरामध्येही पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ हे दक्षिण-पश्चिम राजस्थानाच्या दिशेने गेले आहे. त्यामुळे मुंबईचे हवामान जवळपास कोरडे राहील.

मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आणि तापमानात घट होण्याची शक्यता अस्पष्ट आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये मागील आठवड्यापासून उकाडा असल्यामुळे अनेकांना दिलासा मिळालेला नाही.

मागील दिवस पडत असलेल्या पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी आणि विहार हे तलाव पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहेत. हे दोन्ही तलाव ओसंडून वाहण्यासाठी तलावांची १ ते २ मीटर पातळी वाढण्याची गरज आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या इतर तलावांच्या तुलनेत तुळशी आणि विहार हे तलाव खूप लहान असून त्यांची पाणीसाठवण क्षमतादेखील कमी आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा