Advertisement

राज्यात थंडी वाढणार; पहाटेच्या वेळी तापमानात घट

राज्यभरात पहाटेच्या वेळी तापमानात घट जाणवत आहे. हे तापमान १० नोव्हेंबरपर्यंत आणखी उतरेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

राज्यात थंडी वाढणार; पहाटेच्या वेळी तापमानात घट
SHARES

मुंबईसह राज्यभरात थंडीची (winter) चाहुल लागू लागली आहे. राज्यात सध्या कमी होणाऱ्या किमान तापमानामुळं (temperature) कमाल आणि किमान तापमानातील फरक खूप मोठा असल्याचं प्रकर्षानं जाणवत आहे. ऋतुमानातील बदलांमुळं आरोग्यावरही परिणामांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यभरात पहाटेच्या वेळी तापमानात घट जाणवत आहे. हे तापमान १० नोव्हेंबरपर्यंत आणखी उतरेल अशी शक्यता हवामान विभागानं (weather updates) वर्तवली आहे.

मुंबईत सांताक्रूझ इथं किमान तापमान पुन्हा एकदा २३ अंशांपर्यंत पोहोचलं तर कुलाबा येथील तापमान २५.४ अंश सेल्सिअस होतं. मात्र उर्वरित राज्यामध्ये सरासरी तापमानाहून रविवारी सकाळी नोंदवलेल्या गेलेल्या किमान तापमानाचा पारा खाली उतरलेला आहे. हा पारा काही ठिकाणी १० अंशांच्याही खाली जाईल, अशी शक्यता आहे.

राज्यात सध्या कमी होणाऱ्या किमान तापमानामुळं कमाल आणि किमान तापमानातील फरक खूप मोठा असल्याचे प्रकर्षानं जाणवत आहे. ऋतुमानातील बदलामुळे आरोग्यावरही परिणामांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत सांताक्रूझ इथं कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. त्यामुळं सुमारे १२ अंशांहून अधिक फरक दोन्ही तापमानांत मुंबईकरांनीही अनुभवला.

विदर्भामध्ये रविवारीही बहुतांश ठिकाणी १५ अंशांच्या खाली तापमान होते. चंद्रपूरात राज्यातील सर्वात कमी किमान तापमान म्हणजे १० अंश सेल्सिअस होते. सरासरीपेक्षा हे तापमान ७.६ अंशांनी कमी आहे. यवतमाळमध्ये ११.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. यवतमाळमध्ये सरासरीपेक्षा तापमान ६.३ अंशांनी कमी नोंदवले गेले.

मराठवाड्यात परभणीचे तापमान रविवारी १२ अंशांच्या आसपास होते. मध्य महाराष्ट्रातही जळगाव, नाशिक येथे १३ अंशांपर्यंत तापमान खाली उतरले आहे. हे तापमान १० नोव्हेंबरपर्यंत आणखी खाली घसरण्याची शक्यता असल्याचे मॉडेलनुसार स्पष्ट होत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा