दादर - संविधान दिनाच्या पार्श्वभुमीवर मुंबईतील तरुण-तरुणींनी बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. चेंबूरपासून चैत्यभूमिपर्यंत या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलं. या बाईक रॅलीमध्ये मुंबईभरातील अनेक तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी अनेकांनी दादरच्या चैत्यभूमिवर गर्दी केली होती. दादर आणि शिवाजी पार्क पोलिसांकडून यावेळी सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती.