अंधेरी - लोखंडवाला बॅकरोड परिसरात फ्री स्ट्रीट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी झालेल्या या महोत्सवाचं आयोजन बी हॅप्पी’ फाऊंडेशनने केले होते. हा उस्तव महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील रविवारी साजरा केला जातो. या फ्री स्ट्रीट महोत्सवात लोखंडवाला, ओशिवरा, सात बंगला आणि चार बंगला परिसरातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये खेळ, योग, संगीत, नृत्य, कला, सायकलिंग, स्केटिंग, अॅरोबिक्स, फ्लॅशमॉब, सालसा नृत्य, चित्रकला, क्रिकेट, फॅशन शो, स्ट्रेस रिलीफ बूथ, बॅडमिंटन, खाद्यपदार्थ असे विविध उपक्रम आणि स्पर्धांमध्ये तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. फ्री स्ट्रीट महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमात 'बी हॅप्पी’ संस्थेचे संयोजक शालिनी ठाकरे, विश्वस्त प्रशांत राणे, सुरजीत ददालिया, संदेश देसाई, अभिनेता अर्जुन कपूर उपस्थित होते.