Advertisement

कोण असेल फिनालेमध्ये पोहोचणारा पहिला सदस्य ?

आजवर एकमेकांशी भांडणाऱ्या सदस्यांना आता एकमेकांची एवढी सवय झाली आहे की, हा खेळ संपणार असल्याचं दु:खही त्यांना होत आहे. अशातच बिग बॉसच्या फिनालेमध्ये पोहोचणारा पहिला सदस्य कोण बनणार याची उत्सुकताही सर्वांना आहेच.

कोण असेल फिनालेमध्ये पोहोचणारा पहिला सदस्य ?
SHARES

कायम वादविवाद आणि भांडणांमुळं चर्चेत असलेला बिग बॉसचा खेळ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आजवर एकमेकांशी भांडणाऱ्या सदस्यांना आता एकमेकांची एवढी सवय झाली आहे की, हा खेळ संपणार असल्याचं दु:खही त्यांना होत आहे. अशातच बिग बॉसच्या फिनालेमध्ये पोहोचणारा पहिला सदस्य कोण बनणार याची उत्सुकताही सर्वांना आहेच.


आठवणींना उजाळा

बिग बॉस मराठीच्या घरात जुने सदस्य परत आल्यानं सगळेच खूप भावूक झाले होते. घरामध्ये आलेल्या सदस्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. घरामध्ये आलेल्या सदस्यांवर बिग बॉस यांनी एक महत्वपूर्ण कार्य सोपावलं आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उरलेल्या पाच सदस्यांपैकी त्यांना वाटणार्‍या कोणत्याही दोन सदस्यांना वाचावायचं आहे. हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. 


नाव नोंदणी 

घरामध्ये आलेल्या सदस्यांना त्यांच्या मते सर्वोत्तम असणाऱ्या दोन सदस्यांची नावं द्यायची आहेत. विद्याधर जोशी, दिगंबर नाईक, माधव देवचके, सुरेखा पुणेकर यांनी शिवानी आणि नेहा या दोन सदस्यांची नावं घेतली, तर वैशाली म्हाडेनं शिव आणि नेहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. मैथिली जावकर हिनं शिव आणि वीणा यांची नावे घेतली. बिग बॉसच्या घरातील जुन्या सदस्यांनी वर्तमान काळातील आपापल्या आवडत्या सदस्याला सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं नाव नोंदणी केली आहे. याचा सर्वात जास्त फायदा नेहा आणि शिवानी यांना झाल्याचं दिसत आहे.


बिग बॉसकडून घोषणा

आता घरामध्ये अभिजीत केळकर, रूपाली भोसले, हीना पांचाळ येणार असून, हे सदस्य कोणत्या दोन सदस्यांची नावं घेतात ते पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. यासोबतच आता बिग बॉस एक घोषणा देखील करणार आहेत. नऊ पैकी आठ मत मिळवून बिग बॉस मराठी सिझन २ च्या फिनालेमध्ये पोहचणाऱ्या पहिल्या सदस्याचं नाव काय आहे. तेव्हा जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी सिझन २ चा पुढील भाग पहावाच लागेल.



हेही वाचा  -

‘सेक्रेड गेम्स’ वादात, शीख धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अनुराग कश्यपविरोधात तक्रार

अजय दाखवणार भारतीय फुटबॅालचं सुवर्ण युग




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा