सर्व राजकीय मतभेद विसरून राजकारणी गणेशोत्सवात गणपती बाप्पांचं दर्शन घेताना दिसून येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाचे नेते आणि शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या सार्वजनिक मंडळातील गणपतीचं दर्शन घेतलं. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांच्या घरात विराजमान गणपतीचं दर्शन घेतलं.
तर, उद्धव ठाकरे यांनी देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांच्या घरी सपत्नीक जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कृपाशंकर सिंह यांच्या घरी गणपती दर्शनासाठी पोहोचले. सलग दुसऱ्या वर्षी फडणवीस यांनी सिंह यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. सिंह काँग्रेसमधून भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात असताना ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
हेही वाचा-
गणेशोत्सव २०१९: बघा, रितेशने ‘असा’ बनवला इको फ्रेंडली बाप्पा!
बाप्पाला निरोप देताय? भरतीच्या ‘या’ वेळा लक्षात ठेवा