गणेश मूर्तीचं थेट विसर्जन करायला मुंबईत बंदी घालण्यात आली आहे. Coronavirus चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि विसर्जनाला होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेनं काही उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार थेट विसर्जन नागरिकांना करता येणार नाही.
मुंबईत थेट गणेश विसर्जन करता येणार नाही. त्यानुसार पालिकेकडे मूर्ती सुपुर्द करायच्या. पालिका त्या मूर्तींचं विसर्जन करणार. यासाठी जागोजागी संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या संकलन केंद्रात विसर्जनसाठी मूर्ती जमा कराव्यात, असं आयुक्तांनी म्हटलं आहे. महापालिकेनं साहाय्यक आयुक्तांना सर्व विभागांमध्ये विसर्जन मूर्ती संकलन केंद्र उभारण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा : केशवजी नाईक चाळीतील गणेशोत्सव यंदा 'असा' होणार साजरा
पालिकेनं दिलेला पर्याय मान्य नसेल तर त्यासाठी पालिकेकडून इतर संकल्पना देखील सुचवण्यात आल्या आहेत.
दरम्यान गणेश विसर्जनसाठी भाविकांनी पालिकेच्या shreeganeshvisarjan.com या संकेतस्थळावर नोंदणी सुरू केली आहे. आतापर्यंत दोन हजार भाविकांनी नोंदणी केली असून बहुसंख्य भाविकांनी गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन करण्यासाठी नोंदणी केली आहे. यामुळे गिरगाव चौपाटीवर गर्दी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कृत्रिम तलावाच्या आसपासच्या भाविकांना तेथेच गणेश विसर्जन करण्याची विनंती पालिकेकडून करण्यात येत आहे. गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी नोंदणी केलेल्या भाविकांशी त्यासाठी संपर्क साधण्यात येत आहे.
हेही वाचा