जेबी नगर, अंधेरी (पू) (andheri) येथील रिद्धी सिद्धी मंडळाने आपल्या 49 व्या वर्षात या गणेश उत्सवात (ganesh festival) ‘मानसिक आरोग्या’विषयी जनजागृती करण्याची शपथ घेतली आहे. त्यांनी ‘जियो जी भर के’ नावाचे एक मनोरंजक 15 मिनिटांचे थेट नाटक तयार केले आहे.
मुंबईकरांवर मानसिक आरोग्य कसे परिणाम करते आणि ते अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी लोक त्यांच्या जीवनात कसे बदल करू शकतात किंवा त्यांची मदत कशी घेऊ शकतात हे दर्शविते.
बदलती जिवनशैली आणि तणावामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळेच अनेक आजारांना देखील निमंत्रण मिळत आहे, जे चिंतेचे कारण आहे.
हा स्किट एक ब्लॅक कॉमेडी आहे ज्याच्या सुरुवातीला तुम्हाला यमराज पाहायला मिळेल. यमराज लोकांच्या वाढत्या मानसिक आरोग्याच्या (mental health) समस्यांबद्दल तक्रार करतोय. नाटकात यमराज म्हणतोय की, बऱ्याचदा लोकं मानसिक आरोग्याअभावी आपले जीवन संपवतात आणि त्यांना घेऊन जायची जबाबदारी आमच्यावर येते.
पण हे रोखण्यासाठी ते मुन्ना आणि सर्किट या नाटकातील पात्रांची मदत घेतता. त्यांच्या मदतीने एका तरुण विद्यार्थ्याला वाचवताना दाखवण्यात आले आहे. तो तरूण वाढत्या ताणामुळे आयुष्याला कंटाळलेला असतो. बांद्रे सी लिंकवरून उडी मारण्याच्या बेतात असलेल्या आणि संकटात सापडलेल्या तरूणाला वाचवण्यासाठी ते वेळेत पोहोचतात. मानसशास्त्रज्ञाने मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि दैनंदिन परिस्थिती व्यवस्थापित करण्याच्या टिप्स देऊन या नाटकाचा शेवट होतो.
मानसिक आरोग्य केवळ व्यक्तीच नाही तर त्यांचे कुटुंब, व्यावसायिक जीवन आणि समाजालाही हानी पोहोचवते. देशात प्रगती होऊनही गेल्या 20 वर्षांत आत्महत्येचे प्रमाण दुप्पट झाले आहे हे चिंतेचे कारण आहे. त्यांचा लाइव्ह शोला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांचे खूप कौतुक होत आहे.
दिनेश चिंदरकर (संयोजकांपैकी एक) म्हणाले, “दरवर्षी, आम्ही एक सामाजिक कार्य हाती घेतो आणि त्याची जनजागृती करतो. सी लिंकवरून किंवा लोकल गाड्यांसमोरून उडी मारल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. मोठ्या प्रमाणावर जनसामान्यांना संवेदनशील बनवण्याची वेळ आली आहे. तणावाची पातळी वाढली आहे, ज्यामुळे चिंता आणि नैराश्य येते, त्यांना सामोरे जाण्याचे मार्ग आहेत. हे लोकांना पटवून दिले पाहीजे.
जागरुकता फार महत्वाची आहे, आणि आम्हाला त्याबद्दल आमच्या जवळच्या लोकांशी बोलण्यास किंवा गरज पडल्यास मदत घेण्यास संकोच करण्याची गरज नाही. हाच संदेश आम्हाला या नाटकामधून द्यायचा आहे. वेळ आली आहे की आपण या विषयावर खुलेपणाने बोलू आणि त्याभोवती असलेल्या अडचणी दूर करू.”
मंडळाची गणेशमूर्तीही पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक घटकांनी (eco friendly) बनलेली आहे. गणेशमूर्ती तयार होण्यास सुमारे दोन महिने लागतात.
किरण पटेल (संयोजकांपैकी एक) म्हणाले, “आमची गणेश मूर्ती टिश्यू पेपर, तुरटी आणि नैसर्गिक डिंकापासून बनवली आहे, ज्यामुळे ती पर्यावरणपूरक आहे. मूर्ती तयार होण्यास बराच वेळ लागतो. परंतु आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याकडे आपण सर्वांनी जागरुक होण्याची वेळ आली आहे. समुद्र प्रदूषित होऊ नये म्हणून आम्ही स्थानिक पातळीवर कृत्रिम तलावात विसर्जनही करत आहोत.”
हेही वाचा