दहिसर - आरपीआय आणि वाल्मिकी समाजाच्या वतीने रविवारी वाल्मिकी प्रगट दिन साजरा करण्यात आला. दहिसर पूर्वेकडील शांतीनगरमध्ये हा उत्सव झाला. या कार्यक्रमात अंबादास बोर्डे, श्रावण कांबळे, रावसाहेब, तुलसीराम चौपडे, मामा पाटेकर आणि वाल्मिकी समाजाचे वाल्मिकी सुभाष यांनी सहभाग घेतला. महिलाही कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरजित दुग्गल यांनी केलं.