मुंबईत येऊन इथल्या मूळच्या वडापावला (vada Pav) अशी टक्कर देणं सोपं नाही. पण या समोशानं करून दाखवलं. वडापावच्या बरोबरीनं हा समोसा (Samosa) खपतो आणि यावर थांबत नाही. समोसा चाट, समोसा रगडा, समोसा पराठा अनेक प्रकार मिळतात. काळाबरोबर अनेकविध रूपे घेत समोसा घडत गेला. असा हा समोसा आता सर्वत्र सहज आढळतो, खाल्ला जातो.
आज आम्ही तुम्हाला समोस्याचे काही प्रकार सांगणार आहोत. सांभाळून हा... तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटणार आहे. मला तर खात्री आहे तुम्ही समोस्याचे हे प्रकार वाचून नक्की ट्राय कराल.
ग्रँट रोड स्थानकाच्या पूर्वेला एक शतकी परंपरा लाभलेला इराणी कॅफे म्हणजे बी. मेरवान (B.Merwan & Co.) अॅण्ड कंपनी. इथून जाणाऱ्या-येणाऱ्या अनेक चाकरमान्यांचा दिवस याच कॅफेतील चहा घेऊन सुरू होतो आणि संपतो. चहासोबत इथं बन मस्का, ब्रून मस्का, जॅम-मस्का बन, ऑमलेट असे बरेच पदार्थ मिळतात. पण इथला मावा समोसा देखील प्रचंड फेमस आहे.
साधारण समोस्यामध्ये बटाट्याची भाजी वापरली जाते. पण इथं बटाट्याची भाजी नाही. तर मावा वापरला जातो. माव्यानं भरलेला स्वादिष्ट आणि चटपटीत समोसा तुम्ही नक्की ट्राय करा. कुणाच्याही खिशाला परवडेल अशी याची किंमत आहे. २५-३० रुपये अशी या समोस्याची किंमत आहे.
कुठे : बी. मेरवान, शॉप नंबर १, अलीभाई प्रेमजी रोड, ग्रँट रोड, मुंबई
मुनाफचे द बोहरी किचन (bohri kitchen) मुंबईतच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे मुनाफ बनवत असलेल्या समोस्याला ट्रेड मार्क आहे. मुनाफच्या रेस्टॉरंटमध्ये मटण समोसा, नरगिस कबाब, डब्बा गोश्त आणि कडी भात हे पदार्थ आहेत.
पण त्यांच्या स्मोक मटण खिमा समोस्याला अधिक मागणी आहे.
बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट.
तोंडात टाकताच तुम्हाला थोडी आंबट तिकट अशी चव येते. फक्त खिमा समोसाच नाही तर व्हेजमध्ये तुम्ही पनीर आणि पीनट (शेंगडाण्याचं कुट) पासून बनवलेला समोसा ट्राय करा.
महाराष्ट्रीयन स्पेशल पोहे आणि पंजाबी समोसा या दोन वेगवेगळ्या पदार्थांचं मिश्रण करून पोहा समोसा बनवण्याची किमया केलीय सांताक्रूझच्या सम्राट वडापावनं (samrat vada pav center) ... साधारण समोसामध्ये बटाट्याचं मिश्रण भरलं जातं. पण यात पोह्याचं मिश्रण भरलं जातं.
पट्टी समोसा या नावानं देखील हा समोसा ओळखला जातो. कोबी आणि कांदा टाकून पोहे बनवले जातात. त्यानंतर पोह्याचे मिश्रण समोस्यात भरलं जातं आणि मग त्याला तेलात तळतात. दोन समोसा तुम्हाला ४० पर्यंत मिळतील.
कुठे : रेल्वे कॉलनी, टिळक रोड, सांताक्रूझ स्टेशन जवळ, सांताक्रूझ
बोरीवलीतील द अॅग्लीशियस विशेषतः या डिशसाठी प्रसिद्ध आहे! या डिशमधील समोसा हा अंडा बुर्जीनं भरलेला असतो आणि त्यावर लाल मसाल्याची स्पेशल ग्रेव्ही आणि चीज ग्रेव्ही दिली जाते. अंडा (egg) समोसाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला २०० रुपये मोजावे लागतील.
कुठे
: शॉप नंबर,
हाय राईज सीएचएस एलटीडी,
मेरी इम्याक्युलेट हायस्कूल समोर,
लक्ष्मण म्हात्रे रोड,
आयसी कॉलनी,
बोरीवली
समोसा हा खरंतर चाटचाच एक प्रकार आहे. पण हाच प्रकार कोणी डेझर्टमध्ये आहे, असं सांगितलं तर! विश्वास बसणार नाही ना. पण अंधेरी पश्चिमेकडील 'जेन्युइन ब्रॉस्टर चिकन'मध्ये हा एक वेगळाच प्रकार मिळतो. यामध्ये संपूर्ण चॉकलेट फिलिंग असून जेवणानंतर डेझर्ट म्हणून हा वेगळ्या प्रकारचा समोसा देण्यात येतो.
कुठे
: तिरुपती टॉवर,
शॉप १ आणि २,
जेपी रोड,
वर्सोवा मार्ग,
अंधेरी
cover photo credit - The Bhojan Lane
हेही वाचा