Advertisement

'या' पाच ठिकाणी घ्या हॉट चॉकलेटचा आस्वाद


'या' पाच ठिकाणी घ्या हॉट चॉकलेटचा आस्वाद
SHARES

काही वर्षांपूर्वी भारतातलं चॉकलेट विश्व फाइव्ह स्टार, डेरीमिल्क, इक्लेअर, मेलडी यांसारख्या मोजक्या चॉकलेटपुरतं मर्यादित होतं. मात्र, आता जगभरातली वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स भारतात दाखल होत आहेत. त्यामुळे चॉकलेट वर्ल्ड अधिक समृद्ध, चविष्ट, गोड झालं आहे.  

केवळ चॉकलेटच नव्हे, तर चॉकलेट मिल्कशेक, हॉट चॉकलेट असे भन्नाट प्रकार भारतात दाखल झाले आहेत. चॉकलेटच्या या प्रकारांना पण खवय्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहेलोकांचं चॉकलेटवर असणारं हे प्रेम पाहून मुंबईत अनक ठिकाणी हॉट चॉकलेटचे आऊटलेट्स ओपन झाली आहेत. आम्ही तुम्हाला पाच जागा सांगणार आहोत तिकडे तुम्ही एकदा तरी हॉट चॉकलेट ट्राय कराच.


सुजेट केप्री अॅण्ड कॅफे

बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि अशा थंडगार वातावरणात हॉट चॉकलेट पिण्याची मजा काही औरच. मग तुमच्यासाठी सुजेट केप्री अॅण्ड कॅफेनं हॉट चॉकलेटच्या दोन नवीन रेंज खवय्यांसाठी आणल्या आहेत. 'डार्क चॉकलेट' आणि 'अ फोमी हॉट मिल्क टॉप विथ सुजेट कॅरेमल' हे हॉट चॉकलेटचे दोन प्रकार तुम्ही इथं ट्राय करू शकता


डार्क चॉकलेटसाठी तुम्हाला २०० रुपये मोजावे लागतीलतर फोमी हॉट मिल्क टॉप विथ सुजेट कॅरेमलसाठी १३० रुपये मोजावे लागतील

कुठे : शॉप १४, गॅसपर एनक्लेव्ह, जॉन स्ट्रिट, गोल्ड जिमच्या समोर, पाली नाका, पाली हिल, वांद्रे (.)

वेळ : सकाळी ९ ते रात्री १०.३०


बर्डसाँग कॅफे

पदार्थांमध्ये सेंद्रीय (ऑरगॅनिक) घटकांचा वापर केला जात असल्याने हा कॅफे प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडील हॉट चॉकलेट एकदा तरी ट्राय केलंच पाहिजे. कारण त्यांच्या हॉट चॉकलेटमध्ये ९० टक्के सेंद्रीय (ऑरगॅनिक) कोको असतो. या हॉट चॉकलेटसाठी तुम्हाला १५० रुपये मोजावे लागतील

कुठे : शॉप १-ऑफ हिल रोड, वरोडा रोड, वांद्रे (.)

वेळ : सकाळी ९ ते रात्री ११


चॉकलेटेरीया सॅन चुरू

तुम्हाला इथं अनेक पर्याय आहेत. काय ट्राय करू आणि काय नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल. या कॅफेला भेट दिलीत तर 'डार्क चॉकलेट' आणि 'मिल्क अॅण्ड व्हाईट हॉट चॉकलेट'चा नक्की आस्वाद घ्या. अंधेरीतल्या आऊटलेट्समध्ये तुम्ही केक आणि स्पॅनिश हॉट चॉकलेट ट्राय करू शकता

'अॅजटेका' हा इथला प्रकारही प्रचंड प्रसिद्ध आहे. अॅजटेकामध्ये हॉट चिली आणि सिनेमन याचा वापर हॉट चॉकलेटमध्ये केला जातो. वांद्रेच्या आऊटलेटमध्ये १९० रुपयांपासून तर अंधेरीच्या आऊटलेटमध्ये १५० रुपयांपासून हॉट चॉकलेट उपलब्ध आहेत.  

कुठे : ११सिलव्हर पल, वॉटरफिल्ड रोड, लिंकिंग रोड, वांद्रे (.)

वेळ : सकाळी ११ ते रात्री १२


फूड फॉर थॉट

'फूड फॉर थॉट' या कॅफेमध्ये तुम्हाला घरच्यासारखे वातावरण अनुभवायला मिळेल आणि यासाठीच हा कॅफे ओळखला जातो. किताब खाना नावाच्या या वाचनालयातच हा कॅफे आहे. त्यामुळे तुम्ही इथं बसून पुस्तक वाचत हॉट चॉकलेटचा आस्वाद घेऊ शकता. एका कपमध्ये सर्व्ह करण्यात येणारं हॉट चॉकलेट खूप थिक असून स्वादिष्ट असतं. इथल्या हॉट चॉकलेटचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला २०० रुपये मोजावे लागतील

कुठे : ४५/४७,किताब खाना, सोमया भवन, महात्मा गांधी रोड, फ्लोरा फाऊंटन, फोर्ट

वेळ : सकाळी ७ ते संध्याकाळी ७.३०


थिओब्रोमा

'थिओब्रोमा' हा कॅफे क्वीन ऑफ डिझर्ट म्हणून ओळखला जातो. त्यांच्याकडे डिझर्ट्सचे बरेच स्वादिष्ट प्रकार आहेत. पण त्यांच्या थिक हॉट चॉकलेटला अधिक पसंती दिली जाते. चॉकलेट प्रमींसाठी हा कॅफे नसून स्वर्ग आहे. हॉट चॉकलेटसाठी वापरण्यात येणारं चॉकलेट हे होममेड आहे. यामध्ये ८० टक्के चॉकलेट आणि २० टक्के दूध असते

कुठे : २४, कुलाबा कॉजवे, अपोलो बंदर, कुलाबा

वेळ :  सकाळी ९.३० ते ११.३०



हेही वाचा

डार्क चॉकलेट चवीला कडू पण आरोग्यासाठी गोड




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा