Advertisement

कल्याण डोंबिवलीत गुरूवारी ३६६ नवीन रुग्णांची नोंद

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे ३६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

कल्याण डोंबिवलीत गुरूवारी ३६६ नवीन रुग्णांची नोंद
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे ३६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे गुरूवारी ५०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

नवीन ३६६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ३८९ झाली आहे. यामधील ११ हजार ३६५ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. सध्या ५७४३ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत येथे २८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  गुरूवारी वाढलेल्या नवीन ३६६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ७०, कल्याण प. ९८, डोंबिवली पूर्व १२६, डोंबिवली प. ५४, मांडा टिटवाळा ५, मोहना १२ तर पिसवली येथील एका रूग्णाचा समावेश आहे.

बरे झालेल्या रुग्णांमध्ये टाटा आमंत्रामधील १६० रुग्ण,  वै.ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलमधील १६ रुग्ण येथून, तर बाज आर. आर. रूग्णालयातील १५ रुग्ण आहे. आहेत.  तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसंच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहे.


हेही वाचा -

मुंबईत खारमध्ये कोरोना वाढीचा वेग सर्वात कमी

पालिकेकडे गणपती मंडळांचे फक्त १५० अर्ज

अरे बापरे ! एका दिवसात १० हजार रुग्ण, २८० जणांचा दिवसभरात मृत्यू




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा