शारीरिक स्वास्थ राखण्यासाठी व्यायामासोबतच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपली लाइफस्टाइलही बदलली आहे. आपलं राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयी यामध्ये कमालीचा बदल झालेला आहे. आता रोजच्या खाण्यापिण्यात आपलं 'मीठ', 'साखर' आणि 'तेल' याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. जंकफूडमध्ये या तिन्ही पदार्थांचे प्रमाण अधिक असतं. परिणामी आपल्याला शारीरिक व्याधी होण्यास सुरुवात होते. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि अमर गांधी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एमसीजीएम, गैर-संचारीजनजन्य रोग (एनसीडी) बद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी 'एक चम्मच कम' या अभियानाचा शुभारंभ केला आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत सुप्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर यांनी पुढाकार घेतला आहे.
आजच्या धावत्या युगात लोकं आपल्या आरोग्याकडे खूप कमी लक्ष देताना दिसत आहेत. बदलत्या लाइफस्टाइलमुळे आपल्या सवयी देखील बदलत चालल्या आहेत. तेल, मीठ आणि साखर आपल्या जेवणात जास्त प्रमाणात असले तर त्यातून आपल्याला अनेक शारीरिक व्याधी होण्याचा धोका असतो. जसे की, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, लठ्ठपणा, अस्वस्थपणा असे आजार उद्भवतात. आजच्या तरुणाईचा स्ट्रीट फूड आणि कोल्ड्रिंक्सकडे जास्त कल दिसतो आणि याच कारणामुळे तरुणांमध्ये या शारीरिक समस्या समोर येताना दिसत आहेत.
रोजच्या जेवणात आपण तेल, मीठ, आणि साखरेचे प्रमाण कमी ठेवले तर आपल्याला उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, लठ्ठपणा, अस्वस्थपणा सारख्या व्याधी होणार नाहीत. यामुळेच सार्वजनिक आरोग्य विभाग आणि अमर गांधी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'एक चम्मच कम' हे अभियान सुरु केले. 'एक चम्मच कम' म्हणजे रोजच्या खाण्यामध्ये मीठ, साखर आणि तेलाचे प्रमाणक चमचा कमी !
रील लाईफप्रमाणे आपल्या रियल लाईफमध्येही फिट असलेला अभिनेता फरहान अख्तर 'एक चम्मच कम' या मोहिमेचा ब्रँड अम्बेसेडर आहे. ते या मोहिमेबद्दल सांगतात की, "भारतातील ६१ टक्के मृत्यू आता हृदयविकारविषयक आजार (कोरोनरी हार्ट रोग, स्ट्रोक आणि हायपरटेन्शन) ४५ टक्के, नंतर श्वसनक्रिया संबंधी रोग (२२ टक्के), कर्करोग (१२ टक्के) आणि मधुमेह (३ टक्के) मुळे होताना दिसत आहेत. मीठ, साखर आणि तेलाचा जर आपण कमी वापर केला तर आपल्याला हे आजार होणार नाही आणि आपली जीवनशैली आणखी जास्त सुधरू शकेल.
अमर गांधी फाऊंडेशनच्या डॉ. भूपेंद्र गांधी म्हणतात की, "दररोज फक्त मीठ, साखर आणि तेलाचा एक चमचा कमी घ्या आणि शारीरिक व्याधींपासून दूर रहा. उदा. हे स्पष्ट आहे की एखाद्या व्यक्तीच्या आहारात खूप सोडियम हानिकारक ठरू शकते आणि यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण देखील वाढतो. मीठ, साखर आणि तेलाच्या अतिवापराने हृदयविकाराच्या झटक्याचा धोकादेखील उद्भवू शकतो."
मुंबई महानगर पालिकेच्या या मोहिमेस प्रोत्साहन देण्यासाठी एमसीजीएम 50 पेक्षा जास्त बसस्थानकांवर होर्डिंग आणि रेल्वे स्थानकांवर स्टेशन बोर्ड देण्यात येणार आहे असे एमसीजीएमचे महापौर अजोय गुप्ता यांनी सांगितले की, 'एक चम्मच कम' मोहिमेमुळे लोकांना गैर-संसर्गजन्य रोगांचे गंभीर स्वरूप आणि त्यांच्या रोजच्या जीवनात आहारातील बदलांची आणि व्यायामांची जाणीव करून देणे हे होते.