Advertisement

घाटकोपरमध्ये रक्तदान शिबीर


घाटकोपरमध्ये रक्तदान शिबीर
SHARES

घाटकोपर – स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बाल मित्र क्रीडा मंडळाने घाटकोपर पश्चिम मधील शांतीनगर येथे रविवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात एकूण 81 जणांनी रक्तदान केले.

बाल मित्र क्रिडा मंडळाचे हे 12 वे रक्दान शिबिर आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र आणि छोटीशी भेट देखील यावेळी देण्यात आली. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीच्या नावातून गणपतीचे चित्र काढून त्या व्यक्तीचे आभारही बाल मित्र क्रिडा मंडळाने मानले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा