Advertisement

स्वच्छ खाजगी रुग्णालयाचा मान कोहिनूर हॉस्पीटलला


स्वच्छ खाजगी रुग्णालयाचा मान कोहिनूर हॉस्पीटलला
SHARES

मुंबईमधील कोहिनूर हॉस्पिटलला 'स्वच्छ खाजगी रुग्णालय' या विभागामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) स्वच्छता अभियानात मोलाची कामगिरी करणाऱ्या संस्थांसाठी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्वच्छता सर्वेक्षण २०२०च्या अहवालानुसार कोहिनूर हॉस्पिटलनं 'स्वच्छ खाजगी रुग्णालय'चा पुरस्कार पटकावला.

'ग्रीन हॉस्पिटलअशी ओळख

कोहिनूर हॉस्पिटलनं नेहमीच स्वच्छता, पर्यावरणाचं सरंक्षण आणि संवर्धन या तत्वांचे पालन केलं आहे. म्हणूनच 'लीड'चं प्रमाणपत्र असलेलं 'ग्रीन हॉस्पिटल' अशी कोहिनूर हॉस्पिटलची ओळख आहे. अलीकडेच कोहिनूर हॉस्पिटलनं १० वा वर्धापन दिन साजरा केला. आता महानगर पालिकेकडून स्वच्छतेसाठी दुसरे मानाकंन प्राप्त झाले. त्यामुळे सध्या कोहिनूर हॉस्पिटल दुहेरी आंनद साजरा करत आहे.

कोहिनूर हॉस्पिटलचे अतुल मोडक म्हणाले, "जेव्हा आपण उपचारासाठी रुग्णालय निवडतो त्यावेळी स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देतो. त्यामुळे रुग्णालय स्वछ राखण्यासाठी रुग्णालयाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा तसंच रुग्ण आणि रुग्णालयाला भेट देणाऱ्या प्रत्येकाचा सक्रिय सहभाग अपेक्षित असतो. महानगरपालिकेनं केलेल्या सन्मानासाठी संपूर्ण टीमकडून आम्ही आभार व्यक्त करतो.


कोहिनूरचा नवा उपक्रम

कोहिनूर हॉस्पिटलनं 'स्वास्थ्य सबका' या उपक्रमाला सुरुवात केली आहे. त्यामध्ये काही खास हेल्थ पॅकेजेस तयार केली आहेत. ज्यामध्ये गुढघा प्रत्यारोपण,, मोतीबिंदू अशा शस्त्रक्रिया माफक दारात करून मिळतील. तसंच हेल्थ चेकअप, फीजीओथेरेपी, आहार सल्ला, ओपीडी सल्ला यामध्ये देखील सूट देण्यात आली आहे. या उपक्रमामागे माफक दरामध्ये उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणं हा कोहिनूर हॉस्पिटलचा हेतू आहे.   


हे मान्यवर उपस्थित

कोहिनूर हॉस्पिटलचे कार्यकारी अधिकारी डॉ. स्नेहल कंसारिया आणि उपाध्यक्ष श्री. अतुल मोडक यांना महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पदक देऊन सन्मानित केलं गेलं. त्यावेळी या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे युवा मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत महापौर स्नेहल आंबेकर, अभिनेत्री दीपाली सय्यद आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते.   



हेही वाचा



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा