Advertisement

मुंबईत लॉकडाऊन? वर्षा निवासस्थानी कोविडबाबत बैठक सुरू

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईतील वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक सुरू झाली आहे.

मुंबईत लॉकडाऊन? वर्षा निवासस्थानी कोविडबाबत बैठक सुरू
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईतील वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक सुरू झाली आहे. वाढत्या कोरोनामुळं लॉकडाऊनबाबत चर्चा या बैठकीत सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत राज्यभरात लॉकडाऊन होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, एकनाथ शिंदे आणि इतर नेते मंडळी उपस्थित आहेत.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असून, नियमांचं पालन करण्याच्या सूचना राज्य सरकार सतत करत आहेत. मात्र या सूचनांकडं नागरिकांकडून वारंवार दुर्लक्ष केलं जात आहे. अनेक ठिकाणी मास्कचा वापर टाळला जात आहे. तर सामाजिक अंतराच्या नियमांचा ही फज्जा उडाल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाच्या (coronavirus) रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी १ हजार ९२२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढत आहे. तसंच, १५ हजारांच्या पुढे गेली असून रुग्ण दुपटीचा कालावधी १५६ दिवसांपर्यंत खाली आला आहे. मुंबईत एकूण बाधितांची संख्या ३ लाख ४७ हजार ५८१ झाली आहे, मृतांची संख्या ११ हजार ५३९ वर गेली आहे.

एका दिवसात १ हजार २३६ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ३ लाख १९ हजार ७८७ म्हणजेच ९२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  



हेही वाचा -

कोरोनामुळं शिक्षकांना घरून काम करण्याची सूचना

मुंबईची लॉकडाऊच्या दिशेनं वाटचाल; १९२२ जणांना कोरोनाची लागण


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा