Advertisement

पुढील १० दिवस प्रतिदिन ३०० आयसीयू खाटा वाढवण्यात येणार

महापालिकेकडून त्यामध्ये वाढ करण्यात आली असून, पुढील १० दिवस प्रतिदिन ३०० आयसीयू खाटा वाढवण्यात येणार आहेत.

पुढील १० दिवस प्रतिदिन ३०० आयसीयू खाटा वाढवण्यात येणार
SHARES

मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्यानं वाढ होत आहे. वाढती संख्या लक्षात घेत महापालिकेनं मुंबईतील अनेक ठिकाणी विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. या विलगीकरण कक्षात प्रत्येकी १ हजारहून अधिक खाटा आहेत. दरम्यान, अनेक रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयासह विलगीकरण कक्षातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्यात आलं आहे. परंतु, दररोज वाढणाऱ्या संख्येमुळं हे आयसीयू बेड्स कमी पडत आहेत. त्यामुळं महापालिकेकडून त्यामध्ये वाढ करण्यात आली असून, पुढील १० दिवस प्रतिदिन ३०० आयसीयू खाटा वाढवण्यात येणार आहेत.

रुग्णांची वाढती संख्य आणि अतिदक्षता विभागाची असलेली गरज लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेकडे सध्या ५० हजारांहून जास्त खाटा उपलब्ध आहेत. १० हजार ४०० खाटा पालिकेच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. यामध्ये पुढील दहा दिवस प्रतिदिन ३०० आयसीयू खाटा वाढवण्यात येणार आहेत. पालिकेच्या माध्यमातून मुंबईत १६८ ठिकाणी डायलिसिसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या २० दिवसांत एकही डायलेसिस रूग्णाचा मृत्यू झाला नाही अशी माहितीही पालिका आयुक्तांनी दिली.

हेही वाचा - मुंबईतील सर्वाधिक मृत्यू ५० ते ७० वयोगटातील

मुंबई महापालिकेकडून कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून, यामध्ये महापालिकेला यश येत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या १६ दिवसांत दुप्पट होत असताना मुंबईत तब्बल २५ दिवसांनी रुग्ण दुप्पट होत असल्याची नोंद झाली आहे. मृत्यूदरही देशाच्या बरोबरीने ३ टक्के आणि डिस्चार्ज रेट ४४ टक्के असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.

हेही वाचा - पोलिसांनी मजुरांना आतापर्यंत ४ लाख ६६ हजार ई-पासचे केले वाटप

महापालिकेनं 'चेसिंग द व्हायरस' ही मोहीम सुरू केली आहे. तसंच, या मोहिमेला यश येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका पॉझिटिव्ह रुग्णामागे १५ जणांचे विलगीकरण करण्यात येत आहे. रुग्णांवर चांगले उपचार केले जात आहेत. तसेच विलगीकरण केंद्रात लाफिंग थेरपी, योगा थेरपी, सकस आहार आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केल्या जाणार्‍या सहायक उपचारांमुळे कोरोना नियंत्रणात आल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा -

महापालिकेनं सर्वाधिक ७९० इमारती केल्या सील

मनुष्यबळाअभावी बेस्टला फेऱ्या वाढविण्यात अडचणी



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा