Advertisement

कोविडशिल्डचा दुसरा डोस ४५ दिवसांनी, नागरिकांची केंद्रावर गर्दी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशभरात लसीकरण केलं जातं आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी हे लसीकरण सुरू असून, नागरिक कोविडची लस घेत आहेत.

कोविडशिल्डचा दुसरा डोस ४५ दिवसांनी, नागरिकांची केंद्रावर गर्दी
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशभरात लसीकरण केलं जातं आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी हे लसीकरण सुरू असून, नागरिक कोविडची लस घेत आहेत. प्रत्येकाला २ वेळा लस देण्याचं याआधीच निश्चित केलं होतं. त्यानुसार, लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर आले होते. मात्र, कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा २८ दिवसांऐवजी ४५ दिवसांनी देण्याचा निर्णय सोमवारी जाहीर झाल्यानंतरही त्याबाबत स्पष्ट सूचना देणारे संदेश लाभार्थ्यांना न गेल्यामुळे नियोजित दुसरी मात्रा घेण्यासाठी लाभार्थ्यांनी मंगळवारी लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. अचानक बदललेल्या नियमांमुळे अनेक नागरिकांना परत जावे लागले.

कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा चार आठवड्यांनी दिली जात होती. परंतु शास्त्रीय अहवालांचा दाखला देत सहा ते आठ आठवड्यांनी ही लस देण्याचा निर्णायक बदल सोमवारी केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केला. त्यानंतर राज्यानेही संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या, परंतु याची माहिती लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रावर पोहचल्यावर समजली. काही लाभार्थ्यांना माध्यमांमधून समजले असले तरी खात्री करून घेण्यासाठी ते मंगळवारी केंद्रावर आले होते.

जनजागृती आवश्यक

लशीची दुसरी मात्रा ६ आठवड्यांनी का घ्यावी याबाबत जनजागृती झाल्यावर ही अडचण येणार नाही. परंतु सुरुवातीचे काही दिवस हा त्रास होणार आहे. मोबाइलवरून संदेश जाण्याची सुविधा अ‍ॅपमध्ये असून तेथून हे सुधारित संदेश जाणे अपेक्षित आहे

राज्याची लसीकरण स्थिती

राज्यात सोमवारपर्यंत ४५ वर्षांवरील ४ लाख २७ हजार ५८९ जणांनी लस घेतली आहे, तर ६० वर्षांवरील १९ लाख ६० हजार ९७७ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ६० वर्षांवरील अंदाजे एक कोटी ७७ हजार लोकसंख्या राज्यात आहे. राज्यात एकूण ४५ लाख ९१ हजार ४०१ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. यात ९ लाख १७ हजार ९४८ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिली मात्रा आणि ४ लाख ३९ हजार ८३ कर्मचाऱ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे. अत्यावश्यक कमर्चाऱ्यांमध्ये ६ लाख ५९ हजार ५७२ जणांची पहिली मात्रा आणि १ लाख ८६ हजार २३२ जणांची दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे. राज्यात सोमवारी २ लाख ७६ हजार ३५४ जणांचे लसीकरण झाले.

मुंबईची स्थिती 

मुंबईत आत्तापर्यत ४५ ते ५९ वयोगटातील ६६ हजार २९८ जणांचे, तर ६० वर्षांवरील ४ लाख २० हजार २३० ज्येष्ठांनी पहिली मात्रा घेतली आहे. मुंबईत एकूण ९ लाख २ हजार ७७ जणांचे लसीकरण झाले असून यातील ७ लाख ७७ हजार १६३ जणांनी पहिली मात्रा घेतली आहे. १ लाख २४ हजार ९१४ जणांनी दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे.



हेही वाचा - 

राज्यात मंगळवारी १३२ रुग्णांचा मृत्यू, २८,६९९ नवे रुग्ण

यंदा होळी सण साजरा करण्यास मनाई


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा