वडाळा - श्रीकृष्ण स्पोर्ट्स क्लब आणि श्रीकृष्ण नगर रहिवाशी मंडळ यांच्यावतीनं वडाळा येथील श्रीकृष्णनगर मधील रहिवाशांसाठी मोफत योगा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. 13 ते 18 डिसेंबरपर्यंत हे योगा शिबीर असणार आहे. या कार्यक्रमाच आयोजन विभागातील रहिवासी नितीन मिंडे आणि प्रवीण झाजम यांच्यावतीनं करण्यात आलं असून पहिल्यांदाच अशा प्रकारचं हे मोफत योगा शिबीर भरवण्यात आलंय.
या प्रशिक्षण शिबिरात 13 वर्षांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना सहभागी हाेता येणार आहे. या संपूर्ण योगा शिबिराचे प्रशिक्षण हे तुषार घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. योगासने, सूर्यनमस्कार या शिबिरात शिकविलं जाणारं आहे. लोकांच्या नेहमीच्या धावपळीच्या जीवनात स्वतःचे आरोग्य कशाप्रकारे निरोगी ठेवता येईल याचे मार्गदर्शन करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचं रहिवाशी 'नितीन मिंडे' यांनी सांगितलं.