कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातला आहे. या आजारामुळे फक्त चीनमध्येच साडे तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जगभरात दीड लाखापेक्षा जास्त लोकांना या आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हायरस आता महाराष्ट्रात धडकला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता ७ वर पोहचली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्याल यासाठी ११ उपाय आम्ही सांगणार आहोत.
१) नियमित हात धुवा
दिवसातून जास्तीत जास्त वेळा साबणानं नियमितपणे हात धुवा.
यामुळे हातावरील विषाणूंच्या प्रतिबंधासाठी ते उपयोगी ठरेल.
२) मास्क वापरा
सर्दी,
खोकला झाल्यास आपला संसर्ग इतरांना होऊ नये यासाठी डॉक्टरी सल्ल्यानं योग्य तेच मास्क वापरा. घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी योग्य मास्कचा, योग्य प्रकारे वापर करा.
३) सुरक्षित अंतर राखा
आपल्या आसपासच्या लोकांमध्ये किमान ३ फूट अंतर ठेवा. विशेषतः ज्यांना सर्दी खोकला असेल अशा लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
४) नाक,
तोंड,
डोळ्यांना वारंवार हात लावू नका
आपण अनेक वस्तूंना स्पर्श करीत असतो. ज्यामुळे आपल्या हातावर बॅक्टेरिया असतात. वारंवार नाक, तोंड,
डोळ्यांना हात लावल्यानं हातावरील विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात.
५) रुमालाचा वापर करा
शिंकल्यानंतर नाका-तोंडातून निघणाऱ्या तरल पदार्थांमध्ये अनेक बॅक्टेरिया असतात.
त्यामुळे शिंकताना नाका-तोंडावर रुमाल किंवा टिश्यू धरा.
खोकताना देखील हातावर रुमाल धरा.
६) मोबाईलची स्क्रीन स्वच्छ ठेवा
आठवड्यातून एकदा तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला डिसइन्फेटिंग वाइप्सने साफ करा. या वाइप्समुळे मोबाईलच्या वरील भागावरील किटाणू मरतात.
७) बाथरुम स्वच्छ ठेवा
बाथरुमची स्वच्छता करताना शॉवर डेटॉलसारख्या औषधी द्रव्यानं जरुर स्वच्छ करा. खास करून कमोडवर बसताना त्याचा प्रुष्ठभाग साफ करून बसा.
८) विमान प्रवासात घ्यावयाची काळजी
विमान प्रवासात स्वच्छ हात धुतल्यानंतरच विमानसेवेच्या कर्मचाऱ्यांच्या हातून खाद्यपदार्थ घ्या.
कारण विमान प्रवासात विमान कर्मचाऱ्यांमार्फत कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता सर्वाधिक असते.
९) प्रवास सहसा टाळा
कोरोना व्हायरसची लागण टाळण्यासाठी शक्यतो लांबवरचा प्रवास टाळा.
त्यामुळे व्हायरस पसरण्याची शक्यता आहे.
१०) गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा
कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे.
तो प्रचंड वेगानं पसरत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी न जाणं योग्य ठरेल.
११) दुर्लक्ष करु नका
जर तुम्हाला ताप, सर्दी असेल किंवा श्वसनास त्रास होत असेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जा. तसंच अशा वेळी घरातच थांबा.हेही वाचा