मुंबईमध्ये पावसासोबतच साथीचे आजारदेखील वाढले अाहेत. काही दिवसांपूर्वी लेप्टोस्पायरोसिस या अाजारामुळे ३ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर साथीच्या रोगांवर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिका पूर्णपणे सज्ज झाली आहे.
मुंबईतील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये साथीचे अाजार झालेल्या रुग्णांच्या सेवेसाठी २५०० पेक्षा जास्त विशेष खाटा उपलब्ध केली असल्याची माहिती विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली अाहे. तसंच केईएम रुग्णालयाप्रमाणे राजावाडी, भाभा आणि इतर उपनगरीय रुग्णालयांमध्ये तापासाठी विशेष ओपीडी सुरू करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी मलेरियाचे ५५० रुग्ण अाढळले होते. तर या वर्षी जून महिन्यात एकूण ३८० जणांना मलेरिया झाल्याचं निदान झालं आहे.
साथीच्या आजाराच्या सर्वे आणि प्रथमोपचारासाठी मुंबईतील प्रत्येक ठिकाणी आरोग्यसेविका कार्यरत राहणार असल्याची माहिती डॉ. केसकर यांनी दिली. ७५ केंद्रातून ३७०० पेक्षा जास्त आरोग्यसेविका मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्याच्या अखेरपर्यंत साथीच्या आजाराचे रुग्ण कमी असल्याचं डाॅ. केसकर यांनी सांगितलं. हा अाकडा असाच कमी राखण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत असंही त्यांनी सांगितलं.
पावसाच्या पाण्यामुळे गॅस्ट्रो, जुलाब, मलेरिया लेप्टो, डेंग्यू, कॉलरा अादी अाजार होतात. त्याचप्रमाणे खोकला सर्दी, ताप, चिखल्या किंवा गजकर्ण आणि त्वचेचे अाजारदेखील उद्भवतात, अशी माहिती संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर यांनी दिली.
हेही अाजार -