कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या १६ खासगी रुग्णालयांवर पालिकेने कारवाई केली आहे. या रुग्णालयांकडून २४ लाख रुपयांची वसुली करून ही रक्कम संबंधित रुग्णांना परत करण्यात आली आहे.
या १६ खासगी रुग्णालयांनी करोना उपचारानंतर अवाजवी बिल देत रुग्णांची लूट केली होती. कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने (केडीएमसी) या रुग्णालयांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेने संबंधित रुग्णालयांकडून खुलासा मागवत अधिकच्या बिलाची रक्कम रुग्णांना परत केली आहे.
रुग्णालयांनी एकूण बिलाच्या रकमेपैकी ४९ लाख ९३ हजार ६७९ रुपये अधिक आकारल्याचं पालिकेच्या निदर्शनास आलं. त्यापैकी २४ लाख ७९ हजार रुपये रुग्णांना परत केले आहेत. उर्वरीत रक्कम संबंधित रुग्णालयांकडून वसूल होणे बाकी आहे.
याआधी कोरोना रुग्णांकडून अधिक बिल आकारणे, महापालिका तसंच शासकीय खाटांची स्वतंत्र नोंदी ठेवण्यात हयगय करणे असे आक्षेप नोंदवत कल्याण डोंबिवली महापालिकेने येथील श्रीदेवी या खासगी कोविड रुग्णालयाचा परवाना रद्द केला होता. तर अशाच प्रकारची कारवाई ए अॅन्ड जी खासगी रुग्णालयावरही केली होती.
मुंबईत कोरोनाचे ७४३ नवे रुग्ण, दिवसभरात २० जणांचा मृत्यू
राज्यात ११ हजार ०१५ नवे रुग्ण, दिवसभरात २१२ जणांचा मृत्यू