कल्याण-डोंबिवलीत दिवसेंदिवस कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे शनिवारपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ३२ कंटेन्मेंट झोनमध्ये पुन्हा लागू करण्यात आला आहे.
या ३२ ठिकाणी किराणा दुकानांना होम डिलिव्हरीची मुभा असेल, तसंच भाजी विक्री एका ठिकाणी न बसून फिरून करावी लागणार आहे.
शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीमध्येही ३५८ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे येथील एकूण रुग्णसंख्या ४,८७७ झाली आहे. गेल्या चार दिवसात कल्याण-डोंबिवलीत रोज ३०० पेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली होती. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कंटेन्मेंट झोनमध्ये दूध विक्री आणि अत्यावश्यक सेवा या सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसंच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता प्रवास करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
कंटेन्मेंट झोन


हेही वाचा -
Coronavirus Pandemic: मुंबईत १२९७ नवे रुग्ण, दिवसभरात ४४ जणांचा मृत्यूअरे बापरे ! राज्यात ५०२४ नवे रुग्ण, १७५ जणांचा मृत्यू