Advertisement

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

जयंत पाटील यांनी सांगितलं की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. ते सध्या परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. 

जयंत पाटील यांनी सांगितलं की,  माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे. लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची वेळ येऊ नये, यासाठी गर्दी टाळणे, मुखपट्टीचा वापर करणे, समारंभ साधेपणाने साजरे करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जनतेला केलं आहे.



हेही वाचा -

कोरोना: मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांवर महापालिकेची नजर

राज्यात आठवड्यानंतर कडक निर्बंधांचे संकेत



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा