Advertisement

आता डॉक्टरांच्या परवान्याचं ऑनलाईन नुतनीकरण शक्य


आता डॉक्टरांच्या परवान्याचं ऑनलाईन नुतनीकरण शक्य
SHARES

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचं देशातील पहिलं एम. एम. सी मोबाईल ॲप बुधवारी लॉन्च करण्यात आलं आहे. या अॅपचा फायदा वैद्यकीय व्यावसायिकांसह सामान्य जनतेलाही होणार आहे.

या अॅपमध्ये वैद्यकीय व्यावसायिकांची संपूर्ण माहिती असणार आहे. या अॅपद्वारे डॉक्टरांना वैद्यकीय परवान्याचे नुतनीकरण ऑनलाईन करता येणार आहे. तर, सर्वसामान्य रुग्णाला आपल्या डॉक्टरांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

डिजीटल महाराष्ट्राला चालना देणारा हा अत्यंत चांगला उपक्रम असून या अॅपमुळे नोंंदणीकृत असलेल्या जवळपास 1 लाख 40 हजार वैद्यकीय व्यावसायिकांना परिषदेच्या कार्यालयात न येता देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असले, तरी या मोबाईल ॲपद्वारे परिषदेकडे ऑनलाईन अर्ज सादर करणे, शुल्क भरणे, तसंच परिषदेकडून तात्पुरत्या नोंंदणीचं प्रमाणपत्र, चांगल्या वर्तणुकीचं प्रमाणपत्र, असे विविध फायदे मिळणार आहेत.

गिरीष महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री

हे मोबाईल ॲप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असून तेथून डाऊनलोड करुन घेता येईल. तसंच, अशा प्रकारे ॲप डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास हे मोबाईल ॲप वैद्यकीय परिषदेच्या www.maharashtramedicalcouncil.com या वेबसाईटवरुन डाऊनलोडही करुन घेता येऊ शकेल, अशी माहिती वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली.



नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाला मोबाईल ॲपद्वारे निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यशाळांना (सी.एम.ई.) उपस्थित राहिल्यामुळे किती क्रेडिट पॉईंट मिळाले, याची माहितीही या ॲपद्वारे मिळू शकेल. परिषदेने वेबसाईटवर जी माहिती प्रसिद्ध केली आहे, ती माहिती देखील या ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

डॉ. शिवकुमार उत्तुरे, अध्यक्ष, वैद्यकीय परिषद

कायमस्वरुपी नोंदणीकरता वैद्यकीय व्यवसायिकांना ॲपद्वारे अर्ज सादर करणं, तसंच, ऑनलाईन शुल्क भरणं, इ. कामं घरबसल्या करता येतील. तसंच नोंदणीच्या माहितीची वैधता ऑनलाईन तपासता येणार आहे.


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा