Advertisement

नवयुगचे रक्तदान शिबीर


नवयुगचे रक्तदान शिबीर
SHARES

सायन - 'नवयुग ग्रुप' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सायन येथील वल्लभ विद्यालयात रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठेवण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात 300 हून अधिक लोकांनी सहभाग घेत रक्तदान केले.

नवयुग ग्रुपचे यंदाचे हे सातवे वर्ष आहे. हे रक्त सायन, जे.जे, राजावाडी या सरकारी रुग्णालयात पाठवून आपात्कालीन आणि अपघात विभागातील रुग्णांसाठी त्याचा उपयोग केला जातो. "आम्ही राबवत असलेल्या या शिबिरातून अनेकांना मदत होते", असे नवयुग संस्थेचे संयोजक राजेश वेशाह यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा