Advertisement

आरोग्य सेतूवर आले 'हे' नवीन फिचर, 'असे' ठरेल फायदेशीर

आता एक नवीन फीचर भारत सरकारच्या आरोग्य सेतू या अॅपने लाँच केलं आहे.

आरोग्य सेतूवर आले 'हे' नवीन फिचर, 'असे' ठरेल फायदेशीर
SHARES

आता एक नवीन फीचर भारत सरकारच्या आरोग्य सेतू या अॅपने लाँच केलं आहे. आता लसीकरणाबद्दलची माहिती या फीचरमुळे मिळणार आहे. लस घेतलेल्या युजर्ससाठी आता या अॅपवर ब्लू टिक आणि ब्लू शिल्ड दिसणार आहे.

कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्यापासून जास्त धोका असलेल्या लोकांची माहिती मिळवण्यासाठी हे अॅप वापरले जात होते. आता त्यात हे नवे फीचरही मिळणार आहे. या अॅपवरुन लसीकरणासाठी नोंदणीही करता येते.

ही माहिती आरोग्य सेतूच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे. या अॅपमधील युअर स्टेटस या टॅबमध्ये गेल्यावर युजरच्या लसीकरणाबद्दलची माहिती मिळणार आहे. युजरनं जर लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तर या टॅबमध्ये व्हॉटसपप्रमाणे दोन ब्लू टिक आणि शिल्ड दिसेल.

तसंच कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्रही आरोग्यसेतू या अॅपवरुन डाउनलोड करुन घेता येणार आहे. लसींचे दोन्ही डोस घेतलेले युजर्स हे प्रमाणपत्र डाऊनलोड करुन घेऊ शकतात.



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा