Advertisement

कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी ४ रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष

कोरोनाच्या (corona) संशयित रुग्णांसाठी मुंबईतील आणखी ४ रुग्णालयातही विलगीकरण कक्ष (Separation Room) तयार करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी ४ रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष
SHARES

कोरोनाच्या (corona) संशयित रुग्णांसाठी मुंबईतील आणखी ४ रुग्णालयातही विलगीकरण कक्ष (Separation Room) तयार करण्यात येणार आहे.  राजावाडी (Rajawadi), वांद्रे भाभा रुग्णालय (Bandra Bhabha Hospital), कुर्ला भाभा रुग्णालय (Kurla Bhabha Hospital) आणि जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय (Balasaheb Thackeray Trauma Hospital) आदी रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे. याआधी कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. 

मुंबईत आढळलेल्या करोनाच्या संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवलं जातं.  कस्तुरबात सध्या २८ खाटांची सुविधा उपलब्ध आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून  पालिकेच्या आणखी ४ रुग्णालयांत विलगीकरण कक्ष उभारण्याची तयारी मुंबई पालिकेने सुरू केली आहे. कस्तुरबातील विलगीकरण कक्षामध्ये आणखी १०० खाटांची निर्मिती केली जाणार आहे. तर  राजावाडी, वांद्रे भाभा रुग्णालय, कुर्ला भाभा रुग्णालय आणि जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात ५०० खाटा उपलब्ध केल्या जाणार आहेत. 

इराणमधील संशयित रुग्णांची चाचणी करण्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतील (एनआयव्ही) एक संशोधक इराणला रवाना झाले आहेत. चाचणीची सुविधा उपलब्ध नसल्याने भारताकडे इराणने मदत मागितली होती. त्यानुसार योग्य पद्धतीने कोरोनाची चाचणी करण्यासाठी संशोधक पाठविल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


हेही वाचा -

महिला अत्याचारांच्या खटल्यासाठी ४८ विशेष न्यायालय स्थापन करणार - अनिल देशमुख

PNB घोटाळा : नीरव मोदीच्या संपत्तीचा आज लिलाव, लिलाव थांबवण्यासाठी मुलाची बॉम्बे कोर्टात धाव

मुंबई विमानतळावर आतापर्यंत ५५१ विमानांमधून ६५,६२१ प्रवाशांची तपासणी




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा