Advertisement

२ रुग्णालयांना ठाणे महापालिकेने ठोठावला १६ लाखांचा दंड, 'हे' आहे कारण'

गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या या रुग्णालयांविरोधात तक्रारी आल्या होत्या. त्याची शाहनिशा करुन ठाणे महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे.

२ रुग्णालयांना ठाणे महापालिकेने ठोठावला १६ लाखांचा दंड, 'हे' आहे कारण'
SHARES

कोरोनाची भिती दाखवत अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या ठाणे हेल्थ केअर आणि सफायर या दोन खाजगी रुग्णालयांना ठाणे महापालिकेने 16 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

कोरोनाची लक्षणं नसतानाही रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेणाऱ्या या दोन हॉस्पिटलला चार दिवसांपूर्वी नोटीस पाठवूनही या हॉस्पिटलनी काहीही प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे रविवारी त्यांना 16 लाखांच्या दंडाच्या रकमेची नोटीस ठाणे महापालिकेच्यावतीने पाठवण्यात आली. यापैकी एका हॉस्पिटलला तीन लाख तर दुसऱ्या हॉस्पिटलला 13 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. हा दंड या दोन्ही हॉस्पिटले तात्काळ भरण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. अशाप्रकारे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दंडाची रक्कम आकारणारी ठाणे महापालिकेची ही राज्यातील पहिली कारवाई मानली जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या या रुग्णालयांविरोधात तक्रारी आल्या होत्या. त्याची शाहनिशा करुन ठाणे महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. कोणताही आजार नसताना ठाण्यातील ठाणे हेल्थ केअर आणि सफायर या दोन रुग्णालयांनी अनेक रुग्णांना दाखल करुन त्यांच्याकडून लाखोंची बिले आकारली होती. याबाबत तक्रारी आल्यावर ठाणे महापालिकेने चौकशी करुन ही कारवाई केली आहे. दरम्यान, याआधी कोरोना टेस्ट करणाऱ्या थायरोकेअर नामक खाजगी लॅबवरही ठाणे महानगरपालिकेने कारवाई केली आहे.

गरज नसताना रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेऊन त्यांना सात दिवसांपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात ठेवल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. एका रुग्णालयाने तीन रुग्णांना कारण नसताना दाखल करुन घेतलं आणि सात दिवसांपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात ठेवलं. तर दुसऱ्या रुग्णालयाने 13 रुग्णांना कारण नसताना दाखल करुन घेतलं आणि सात दिवसांपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात ठेवलं.


हेही वाचा -

ठाणे जिल्ह्यात 5137 रुग्णांची कोरोनावर मात, जिल्ह्यातील 'अशी' आहे रुग्णांची सद्यस्थिती

महापालिका, डॉक्टर, नर्स यांच्या प्रयत्नांनंतर धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावला



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा