मुंबईत गेले काही दिवस अनेकदा लसीकरणाबाबत नागरिकांना माहिती मिळत नसल्यामुळं नागरिक केंद्रावर मोठी गर्दी करत होते. त्यामुळं अनेक त्रासांना नागरिकांना समोर जावं लागत होत. परंतु आता हे लसीकरण सुरळीत होण्यासाठी महापालिकेकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसारच पुढील आठवड्यात मुंबईत कोणत्या दिवशी कुणाला लस घेता येणार याबाबत मुंबई महानगरपालिकेने सविस्तर वेळापत्रक जाहीर केलं आहे.
महापालिकेनं जाहिर केलेल्या वेळापत्रकानुसार २४ ते २६ मे या ३ दिवसांच्या कालावधीत कोरोना लसीकरणासाठी स्लॉट बुकिंगची गरज असणार नाही. लसीकरण केंद्रावर थेट येणाऱ्यांचं जागेवरच लसीकरण (वॉक इन) होणार आहे. २७ ते २९ मे या ३ दिवसांच्या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करूनच लसीकरण होणार आहे. तसेच रविवारी ३० मे रोजी लसीकरण बंद असणार आहे.
कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबईकरांचे लसीकरण सुरळीत होण्यासाठी आणि लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळ, लसीच्या मात्रा याचा पुरेपूर व सुयोग्य वापर होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यात त्यांनी कुणाला कशी लस घेता येणार याबाबत सविस्तर माहिती दिलीय आहे.
२४ ते २६ मे रोजी थेट (वॉक इन) लसीकरणा
कोव्हॅक्सीन लस कुणाला घेता येणार?
बीएमसीचं मुंबईकरांना आवाहन
आठवड्यातील लसीकरणाच्या सदर नियोजनामध्ये अनपेक्षित कारणांनी काही बदल करावा लागल्यास त्याबाबतची पूर्वसूचना १ दिवस आधी प्रसारमाध्यमं आणि समाज माध्यमं ह्यांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल.
हेही वाचा -
पीएफमधील ५ लाखांवरील गुंतवणुकीच्या व्याजावर लागणार कर
आयकर विभाग जूनमध्ये लाँच करणार नवे ई-फाइलिंग पोर्टल