वांद्रे - मुंबई विमानतळ परिसरातील झोपडयांच्या पुर्नविकासाचा प्रश्न वर्षानुवर्षे रखडलेला आहे. यासंदर्भात विमानतळ प्राधिकरण अधिकारी आणि विमानतळ झोपडपट्टी पुर्नवसन समितीत बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना आमदार अनिल परब, एम एम आरडीएचे अधिकारी, विमानतळ प्राधिकरणचे अधिकारी, तहसीलदार,पोलीस अधिकारी उपस्थित होते. जोपर्यंत विमानतळ प्राधिकरण अधिकारी योग्य माहिती देत नाही तोपर्यंत सहकार्य करणार नाही अशी भूमिका झोपडपट्टी पुर्नवसन समितीनं बैठकीत मांडली.
विमानतळ प्राधिकरणाच्या जागेत वसलेल्या या झोपडयांचा पुर्नविकास त्याच जागी करण्यात येणार आहे. पण झोपडीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पुर्नविकासाचा आराखडा तयार करण्यात येणाराय. या सर्वेक्षणात रहिवाशांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. पण झोपडपट्टी धारकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सर्वेसाठी सहकार्य करणार नसल्याचं झोपडपट्टी पुर्नवसन समितीनं स्पष्ट केलं.