बृहन्मुंबई महानगरपालिकेनं ओशिवरा आणि मोगरा इथल्या पंपिंग स्टेशनवर काम सुरू केलं आहे. मुंबईचे सातवे आणि सर्वात मोठे पंपिंग स्टेशन तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं माहुलमधील मीठा जमीनसोपवली आहे.
प्रशासनानं मूळत: माहुल आणि मोगरा पंपिंग स्टेशन एकत्रितपणे बनवण्याची योजना आखली, जी पालिकेच्या ब्रिस्टवॉड प्रकल्पाच्या परिघा अंतर्गत आखल्या गेलेल्या सात स्थानकांपैकी शेवटची दोन स्टेशनं आहेत.
२००५ मध्ये मुंबईतील जुन्या नाल्यांचे आधुनिकीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवून हा आराखडा तयार करण्यात आला होता. माहुल पंपिंग स्टेशनकडून किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, वडाळा आणि चेंबूर इथं जलसाठा टाळणं अपेक्षित आहे. कारण त्यात प्रति सेकंदाला १५० घनमीटर पाणी उपसण्याची क्षमता आहे.
तर सध्या मोगरा इथं निर्माणाधीन पंपिंग स्टेशन अंधेरी, ओशिवारा आणि जुहू यासारख्या भागात पाणी साचण्यापासून रोखण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मोगरा इथल्या पंपिंग स्टेशनची किंमत सुमारे २२५ कोटी रुपये असेल तर माहुल युनिटची किंमत २६६ कोटी रुपये आहे.
एजन्सी आता मोगरा इथल्या पंपिंग स्टेशनसाठी निविदा प्रसिद्ध करणार असल्याचं एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. “आम्ही कायदेशीर मत मागितलं होतं आणि आम्हाला सांगण्यात आलं की, मोगरा इथल्या ज्या नाल्यावर पंपिंग स्टेशनची योजना केली गेली आहे ती राज्य सरकारची आहे. म्हणूनच कोणत्याही भूसंपादनाची आवश्यकता नाही. तर, काम सुरू होऊ शकते, ”अधिकारी म्हणाले.
अतिरिक्त नगरपालिका आयुक्त, (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी पंपिंग स्टेशनसाठी मोगरा इथं सुरू होणाऱ्या कामाची पुष्टी दिली. ते म्हणाले, “नाला राज्य सरकारचा आहे. याच कारणास्तव पाणी निचरा विभागाला मुंबई उपनगरीय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहण्यास सांगितलं आहे.”
मोगरा इथं आता हे काम सुरू झाले असले तरी पावसाळ्याच्या काळात शहराच्या समस्या सोडवण्यासाठी हे पुरेसे नाही. त्याची क्षमता पाहता अधिकाऱ्यांनी सांगितलं की, माहुल पंपिंग स्टेशन शहरातील मोठ्या भागात, विशेषत: सायन, कुर्ला आणि माटुंगा यासारख्या भागात पाणी साचू नये यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते असलेले सायन नगरसेवक रवी राजा (आयएनसी) म्हणाले की, माहुल पंपिंग स्टेशनसाठी लागणारी जमीन घेण्यासाठी नागरी संस्थेनं मार्ग शोधणं चालू ठेवावं. “त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची मागणी करून ती जमीन ताब्यात घ्यायला हवी. शहराच्या पूर्वेकडील भागात पुरामुळे जवळपास ५० लाख लोक बाधित आहेत. या पंपिंग स्टेशनच्या बांधकामासाठी एक समर्पित सेल तयार करणं आवश्यक आहे. पूर्ण होण्याच्या टाइमलाइनचे काटेकोरपणे पालन करणं देखील महत्त्वाचं आहे, असं रवी राजा म्हणाले.
हेही वाचा