एन वॉर्डमधील घाटकोपर (पूर्व) इथलं उद्यान सोमवारी बंद करण्यात आलं. अनलॉक ०.१ या मोहिमेअंतर्गत जूनमध्ये सार्वजनिक उद्यानं खुली करण्यात आली. नियमांचं पालन करत मॉर्निंग वॉकची परवानगी देण्यात आली होती. पण नागरिकांनी हे नियम धाब्यावर बसवल्याचं समोर आलं. त्यानंतर उद्यान बंद करण्यात आलं.
अनेक नागरिकांनी सामाजिक दुराव राखला नाही. तसंच नियमांकडे दुर्लक्ष करून मास्क न घातल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) ही कारवाई केली आहे. स्थानिक तसंच या भागातील आमदार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, उद्यानाच्या आसपासच्या परिसरातून COVID 19 चे रुग्ण सापडत असल्याचं समोर येत होतं. केशव बळीराम हेगडेवार यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उद्यानात येणाऱ्यांना मास्क घालण्याचा सल्ला दिला. पण नागरिकांनी त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं.
उद्यान किती दिवस बंद असेल यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून कुठलेच स्पष्टीकरण आले नाही. परंतु असं दिसत आहे की, एकतर नागरिकांना त्यांच्या मॉर्निंग वॉक किंवा जॉगसाठी घरातच व्यवस्था करावी लागेल किंवा क्षेत्राबाहेर असलेल्या उद्यानात जावं लागेल.
एन वॉर्डचे सहाय्यक महानगरपालिका आयुक्त अजितकुमार अंबी म्हणाले, "हाऊसिंग सोसायटींसोबत झालेल्या आमच्या बैठकीत स्थानिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्यान बंद करण्याचा सल्ला दिला."
कोरोनाव्हायरसचे प्रमाण मुंबई आणि महाराष्ट्रातही वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर मुंबईत चांगला असला तरी वाढते रुग्ण पालिका अधिकाऱ्यांसाठी चिंतादायक आहे. कारण रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले रूग्ण सर्वात असुरक्षित आहेत. विशेषतः वृद्ध आणि वेगवेगळे आजार असलेल्यांबाबत अधिक चिंता आहे.
हेही वाचा