दहिसर (dahisar) जकात नाका लवकरच 1538 कोटी रुपये किमतीचे व्यावसायिक आणि वाहतूक (transport) केंद्र बनणार आहे. हा प्रकल्प या महिन्यात सुरू होईल. तसेच हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 42 महिन्यांचा अवधी लागणार आहे. या प्रकल्पात 18,000 चौरस मीटर जमीन समाविष्ट होणार आहे.
19 मजली इमारतीत कार्यालये आणि वाहतूक सुविधा असतील. पहिल्या पाच मजल्यांवर बस पार्किंग असेल, तर 6-9 स्तरांवर कार पार्किंगची (parking) सुविधा असेल. तसेच 10-19 मजल्यांवर व्यावसायिक जागा असतील.
ही साइट वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेद्वारे मुंबई-अहमदाबाद मार्गाला कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. हबमध्ये 1,306 कार आणि 353 बसेससाठी पार्किंगची सुविधा असेल.
प्रकल्पाचा एक भाग म्हणून 16 मजली हॉटेल (hotels) बांधले जाणार आहे. या हॉटेलमध्ये 171 खोल्या आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा असतील. हॉटेल प्रवाशांची सोय करेल आणि फूड प्लाझा आणि पार्किंगसारख्या अतिरिक्त सुविधा पुरवेल. प्रकल्पाच्या या भागाची अंदाजे किंमत 766 कोटी रुपये आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर हा हब स्थानिक प्रशासनासाठी महसूल निर्माण करेल अशी अपेक्षा आहे. या हॉटेलचा वर्षाला 89 कोटी रुपये कमावण्याचा अंदाज आहे.
तर पार्किंगच्या सुविधांमुळे प्रति वर्ष 70 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच खाजगी कार्यालयाच्या जागा भाड्याने दिल्याने पुढील काही वर्षांमध्ये महसूल वाढणार आहे.
गुजरात, राजस्थान आणि उत्तरेकडील राज्यांतील बसेससाठी हे हब प्रमुख ट्रान्झिट पॉइंट म्हणून काम करेल.
या जमिनीचा पूर्वी जकात नाका म्हणून वापर केला जात होता. वस्तू आणि सेवा कर (GST) सुरू झाल्यानंतर, 2017 मध्ये जकात रद्द करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आता या जमिनींचे आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये रूपांतर करणार आहे.
हेही वाचा