दहिसर - दहिसर पूर्व येथील केतकीपाडा आणि शांतीनगर डोंगरी येथे गरीब, विधवा आणि वृद्धांसाठी जननी मानव सेवा या सामाजिक संस्थेच्यावतीन मोफत धान्य वाटप करण्यात आलंय. तासनतास घाम गाळूनही काही गरीबांना, विधवांना आणि वृद्धांना एक वेळच्या जेवणासाठी झगडावं लागतं त्यामुळेच आम्ही हे मोफत धान्य वाटप केल्याचं संस्थेचे अध्यक्ष चौथी प्रसाद गुप्ता यांनी सांगितलंय. तसेच आपली संस्था दरमहिना निराधार महिलांना ५ किलो तांदूळ, २ किलो डाळ आणि ५ किलो गहू वाटप करत असल्याचंही गुप्ता यांनी सांगितलं.