Advertisement

मेट्रोची कामं दर्जेदार, वेळेत पूर्ण करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई मेट्रो प्रकल्प मुंबईकरांसह, महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळं या प्रकल्पातील कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मेट्रोची कामं दर्जेदार, वेळेत पूर्ण करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
SHARES

मुंबई मेट्रो प्रकल्प मुंबईकरांसह, महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळं या प्रकल्पातील कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी अंधेरीतील प्रस्तावित गुंदवली मेट्रो स्थानक, कांदिवली मेट्रो स्टेशन, दहीसर येथील मेट्रो फ्लायओव्हर, डी. एन. नगर मेट्रो स्थानकाच्या कामांची पाहणी केली. या पाहणीवेळी उद्धव ठाकरे यांनी मेट्रोची कामं दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

चारकोप इथं त्यांनी मेट्रो ट्रायल रनच्या तयारीचीही पाहणी केली. त्यानंतर कामं दर्जेदार, वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. मुख्यमंत्र्यांसह यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा