Advertisement

Coronavirus: मुंबई मेट्रो- वनच्या मार्गिकेसह डब्यांची होणार सफाई

जगभरात 'कोरोना' या भयानक व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसच्या भितीनं नागरिक प्रत्येक पाऊल सावधानतेनं टाकत आहेत.

Coronavirus: मुंबई मेट्रो- वनच्या मार्गिकेसह डब्यांची होणार सफाई
SHARES

जगभरात 'कोरोना' या भयानक व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसच्या भितीनं नागरिक प्रत्येक पाऊल सावधानतेनं टाकत आहेत. देशात या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. परदेशातून मुंबईत येणाऱ्या पर्यटकांची विमानतळावर कडक तपासणी केली जात आहे. अशातच मुंबई मेट्रो-१वर ही मोठी सुरक्षा बाळगली जात असून, घाटकोपर ते वर्सोवादरम्यान सुरू असलेल्या मेट्रो वन मार्गिकेवर मुंबई मेट्रोनं खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

या मार्गिकेवर, मेट्रो स्थानकांमध्ये आणि मेट्रोच्या डब्यांमध्ये दररोज रात्री मेट्रो सेवा बंद झाल्यावर साफसफाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मेट्रोनं दिली आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार हा सार्वजनिक ठिकाणांहून होण्याची जास्त शक्यता आहे.

मेट्रोतील डबे, स्थानकांवरील साफसफाईसह तिकीट काउंटर, लिफ्ट्स, एस्केलेटर तसेच प्रवाशांच्या संपर्कात येणारे क्षेत्र आणि रेलिंग्ज साफ करण्यात येणार आहेत. शौचालयांमध्ये सतत स्वच्छता आणि आवश्यकतेनुसार धूरफवारणीही करण्यात येणार आहे. याशिवाय मेट्रो-१ मार्गिकेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता राखण्यास सांगण्यात आले असून, प्रशिक्षण देण्यात येत आहे.



हेही वाचा -

वाचनालयासाठी महापालिकेच्या एम पश्चिम कार्यालयावर स्थानिकांचा मोर्चा

मुंबईतील 'इतक्या' मॅनहोलवर संरक्षक जाळ्या नाही



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा