मुलुंड पूर्वेतील मोरया आणि भोईर तलावांचे लवकरच सुशोभिकरण करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) एक नवीन रूप देण्यासाठी सज्ज आहे. २०२२ पर्यंत या जलस्रोतांची सुधारणा करण्यात येईल.
अहवालानुसार, या प्रकल्पासाठी सुमारे ५.०५ कोटी खर्च येईल आणि ११ महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र, बुधवार, २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
ऑगस्टमध्ये, प्रशासकिय संस्थेनं पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील म्हाडा कॉलनीतील मोरया तलाव आणि नालंदा पब्लिक स्कूलजवळील भोईर तलावाच्या सुशोभीकरणासाठी निविदा मागवल्या होत्या.
दरम्यान, सात कंत्राटदारांनी निविदेला प्रतिसाद देत अंदाजित किंमतीपेक्षा किमान २० टक्के कमी निविदा काढल्या होत्या.
सुशोभिकरण प्रकल्पामध्ये तलावाकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे बांधकाम, रेलिंग, प्रवेशद्वार, पदपथ, हिरवळ विकसित करणं आणि भिंतींच्या दुरुस्तीचा समावेश आहे, असं मिड डेच्या अहवालात नमूद केलं आहे.
याशिवाय, प्रशासनानं जे.एस. इन्फ्राटेकला कंत्राट देण्याचा प्रस्ताव दिला आहे तो BMC च्या अंदाजापेक्षा ३२ टक्के कमी दरानं काम करण्यास तयार आहे.
हेही वाचा