मुंबई (mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (mmrda) लवकरच ऐरोळी काटई नाका रस्ता प्रकल्पाच्या टप्पा 3 चे काम सुरू करणार आहे. या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग 4 (NH-4) आणि काटई नाका दरम्यान रस्ता तयार करणे समाविष्ट आहे. या प्रकल्पासाठी नुकतेच 1981.17 कोटींचे कंत्राट देण्यात आले.
टप्पा 3 पूर्ण होण्यासाठी 48 महिने लागणार आहेत. तसेच सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरू होणार आहेत. हा टप्पा पूर्ण झाल्यावर प्रवासाचा वेळ वाचणार आहे तसेच वाहतूक सुरळीत राहण्यास मदत मिळणार आहे.
ऐरोळी काटई नाका रस्ता प्रकल्प (Airoli Katai Naka Road Project) एकूण 12.3 किलोमीटर लांबीचा आहे. हा रस्ता मुलुंड-ऐरोळी (Airoli) पुलाच्या ऐरोळी टोकापासून सुरू होऊन ठाणे बेलापूर रोडवरून जाणार आहे.
संपूर्ण प्रकल्प तीन टप्प्यात विभागलेला आहे. टप्पा 1 आणि 2 पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी खुले होण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात 0.94 किलोमीटरच्या एलिव्हेटेड सेक्शनसह 3.43-किलोमीटरचा मार्ग आणि 1.68-किलोमीटरचा दुहेरी बोगदा समाविष्ट आहे. उंचावलेल्या भागाला प्रत्येक दिशेने तीन लेन आहेत.
तसेच दुहेरी बोगद्याला चार लेन आहेत आणि त्याते काम जवळपास 90 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. एलिव्हेटेड सेक्शन पूर्णपणे बांधण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यासाठी 556 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दुसऱ्या टप्प्यात ठाणे बेलापूर रोड आणि ऐरोळी ब्रिज दरम्यान 3+3 लेनचा उन्नत रस्ता तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
हा विभाग ऐरोळी स्टेशनजवळील पहिल्या टप्प्यातील एलिव्हेटेड रोडला जोडणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम 75 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. या टप्प्याची किंमत अंदाजे 395 कोटी रुपये आहे.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुलुंड ते काटई नाका दरम्यानचा प्रवास 7 ते 8 किलोमीटरने कमी होईल. तसेच प्रवासाचा वेळ 45 ते 60 मिनिटांनी कमी होणार आहे.
हेही वाचा