Advertisement

गुड न्यूज! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे 8 लेनचा होणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

गुड न्यूज! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे 8 लेनचा होणार
SHARES

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे 8 पदरी होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास आणखी जलद होणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएसआरडीसीने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एमएसआरडीसीने राज्य सरकारला प्रस्तावा पाठवाल आहे.

75 किलोमीटरचा मार्ग 8 पदरी करण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरी दोन्ही बाजूला एक-एक लेन वाढवण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते. सध्या या महामार्गावर जाण्या आणि येण्यासाठी प्रत्येक ३ म्हणजेच एकूण ६ मार्गिका आहेत. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीने मोठा निर्णय घेतला आहे.

एमएसआरडीसी हा महामार्ग 8 पदरी करणार आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ त्याचा अंतिम आराखडा तयार करून निविदा मागवल्या जाणार आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे 8 पदरी झाल्यावर यामहामार्गावर होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. महामार्गावर अमृतांजन पुलाजवळ मोठी वाहतूक कोंडी होते. सकाळ आणि संध्याकाळी होत असलेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाश्यांचे हाल होते. याठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. महामार्ग 8 पदरी झाल्यानंतर वाहनधारकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.



हेही वाचा

मुंबईत वॉटर मेट्रो सुरू होणार

विरार-पनवेल लोकल सेवा लवकरच सुरू होणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा