Advertisement

सायनचा ब्रिज होणार जमीनदोस्त, वाहनांच्या मार्गात बदल

खासगी वाहनधारक, टॅक्सीचालक, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या मार्गांत तसेच बेस्ट बसमार्गांवर बदल करण्यात आले आहेत.

सायनचा ब्रिज होणार जमीनदोस्त, वाहनांच्या मार्गात बदल
(Representational Image)
SHARES

मध्य रेल्वेच्या सायन स्थानकातील रोड ओव्हर पूल 110 वर्षं जुना झाल्याने तो पाडून नव्याने उभारण्यात येणार आहे. तसेच पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी रोड ओव्हर पुलाचे पाडकाम बुधवार, 27 मार्चला रात्री 12 वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे.

पुलाचे पाडकाम त्यानंतर पुनर्बांधणी, पाचव्या व सहाव्या लेनचे काम यासाठी एकूण एक ते दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. या सगळ्या कामासाठी रोड ओव्हर पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात येणार असल्याने पुढील दीड वर्षं मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे.

दरम्यान, वाहनधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतुकीच्या मार्गांत बदल करण्यात आले असून तसे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.

सायन स्थानकातील ब्रिटिशकालीन 110 वर्षं जुना रोड ओव्हर पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने पाडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. हा पूल पाडल्यानंतर पुलाची पुनर्बांधणी करण्यासह पाचव्या व सहाव्या लेनचे काम हाती घेण्यात येणार आहे. सायन पुलाच्या कामासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळाली आहे.

मात्र, 4 जानेवारीपर्यंत माहीमची जत्रा असल्याने व त्यानंतर 10वी आणि 12वीच्या परीक्षा असल्याने पुलाच्या पाडकामास स्थगिती द्यावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती.

शेवाळे यांची मागणी योग्य असल्याचे सांगत परीक्षा संपल्यानंतर पुलाचे पाडकाम हाती घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. अखेर आता 27 मार्चला रात्री 12 वाजल्यापासून पुलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार आहे.

दरम्यान, सायन पुलाची पुनर्बांधणी पाचव्या व सहाव्या लेनचे काम यासाठी दीड वर्षं रोड ओव्हर पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे. त्यामुळे खासगी वाहनधारक, टॅक्सीचालक, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या मार्गांत तसेच बेस्ट बसमार्गांवर बदल करण्यात आले आहेत.

असे आहेत बसमार्गांतील बदल

  • बस क्र. 11 मर्यादित ही बस कलानगरमार्गे टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटलमार्गे नेव्ही नगर येथे जाईल.

  • बस क्र. 181, 255(मर्यादित), 348(म.), 355(म.) या बसेस कलानगरमार्गे टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल, सायन सर्कलमार्गे जातील.

  • बस क्र. ए 376 ही सायन सर्कलहून सायन हॉस्पिटल सुलोचना शेट्टी मार्गाने बावरी कॅम्पमार्गे माहीम येथे जाईल.

  • सी 305 ही बस धारावी आगारहून पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटलहून बॅकबे आगार येथे जाईल.

  • बस क्र.356 (म.), ए 375, व सी 505 या बसेस कलानगर बीकेसीहून प्रियदर्शनी येथे जातील.

  • बस क्र. 7(म.), 22(म.), 25(म.) आणि 411 या बस महाराष्ट्र काटा, धारावी आगारहून पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटलमार्गे जातील.

  • बस क्र. 312 व ए 341 या बसेस महाराष्ट्र काटा, धारावी आगारहून पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल, सायन सर्कलमार्गे जातील.

  • बस क्र. एसी 72 भाईंदर स्थानक ते काळा किल्ला आगार व सी 302 ही बस मुलुंड बसस्थानक ते काळा किल्ला आगार येथे खंडित करण्यात येईल.

  • बस क्र. 176 व 463 या बस काळा किल्ला आगार येथून सुटतील व सायन स्थानक 90 फूट मार्गाने लेबर कॅम्प मार्गाने दादर-माटुंगा स्थानकाकडे जातील.हेही वाचा

अंधेरीतील 124 वर्षे जुना बंगला बीएमसी पाडणार

महालक्ष्मी मंदिराजवळ कुत्र्यांना मांस खाऊ घालणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा