Advertisement

'पीएमएवाय'मध्ये नोंदणी करायचीय? मग सकाळी ९ ते १ अशी वेळ काढा

'मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेर्स'ने 'पीएमएवाय' नोंदणीच काही दिवसांपूर्वी बंद केली. ही नोंदणी पुन्हा सुरु करण्यात आली असली, तरी नोंदणीसाठी सकाळी ९ ते दुपारी १ अशी केवळ ४ तासांचीच वेळ देण्यात आली आहे.

'पीएमएवाय'मध्ये नोंदणी करायचीय? मग सकाळी ९ ते १ अशी वेळ काढा
SHARES

'सर्वांसाठी घर' असं म्हणत केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत 'पंतप्रधान आवास योजना'( पीएमएवाय) आणली खरी. पण या योजनेचा बोजवारा कसा उडत आहे, याचं एक एक उदाहरण समोर येत आहे. 'पीएमएवाय'च्या संकेतस्थळावरील नोंदणीची मुदत संपली असं म्हणत अचानकच 'मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेर्स'ने ही नोंदणीच काही दिवसांपूर्वी बंद केली. ही नोंदणी पुन्हा सुरु करण्यात आली असली, तरी नोंदणीसाठी सकाळी ९ ते दुपारी १ अशी केवळ ४ तासांचीच वेळ देण्यात आली आहे.


गरिबांना घरे देण्यासाठी...

गरिबांना परवडणाऱ्या दरांत घरे देण्यासाठी केंद्र सरकारने 'पीएमएवाय' ही योजना आणली आहे. देशभरात मोठ्या संख्येने परवडणारी घरं बांधत ही घरं अत्यल्प गटातील नाेंदणीकृत इच्छुकांना देण्यात येणार आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांला अडीच लाख रुपयांचं अनुदान देखील देण्यात येणार आहे. यासाठी वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये आणि देशात कुठंही हक्काचं घर नसावं ही मुख्य अट आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजूंना 'पीएमएवाय'मध्ये नोंदणी करणं बंधनकारक आहे.


कुठे करता येते नोंदणी?

'पीएमएवाय'च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ही नोंदणी करता येते. ही नोंदणी असेल तरच मुंबई आणि राज्यातील इच्छुकांना म्हाडा तसंच सिडकोच्या 'पीएमएवाय'मधील घरासाठी अर्ज करता येणार आहे, हे महत्वाचं. असं असताना म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीच्या ऐन वेळेस ही नोंदणी बंद असल्याची बाब समोर आली.

Advertisement


म्हाडा लाॅटरीच्या इच्छुकांना फटका

'पीएमएवाय'मध्ये नोंदणी नसल्याने अनेकांना अर्जच भरता आले नाहीत. त्यामुळे याचा फटका म्हाडाला आणि इच्छुकांना बसला. त्यातही विशेष बाब म्हणजे म्हाडाची 'पीएमएवाय'साठी राज्यातील नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असताना आणि म्हाडाचे उपाध्यक्ष 'पीएमएवाय'चे प्रमुख अधिकारी असताना देखील म्हाडालाच या दुर्लक्षीतपणाचा फटका बसला आहे.


अखेर आली जाग...

कोकण मंडळाची अर्ज विक्री स्वीकृतीची प्रक्रिया सुरू असताना कोकण मंडळाने वा म्हाडा प्राधिकरणाने याकडे लक्ष दिल नाही. त्यामुळे 'पीएमएवाय'च्या घरांना प्रतिसादच मिळाला नाही. इच्छुकांकडून तक्रारी आल्यानंतर, कोकण मंडळाच्या लॉटरीत फटका बसल्यानंतर नोडल एजन्सी म्हाडाला आणि 'मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स'ला अखेर जाग आली आहे. ही नोंदणी नुकतीच पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.

Advertisement


थेट संकेतस्थळावर भरा अर्ज

सिडकोसाठी अर्ज भरण्यास इच्छुक अर्जदारांसाठी देखील ही दिलासादायक बाब आहे. पण इच्छुकांना नोंदणी करण्याकरीता सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेतच ही नोंदणी करता येईल. सिडकोने 'पीएमएवाय'च्या संकेतस्थळाबरोबर नवी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळाची लिंक ही 'पीएमएवाय' नोंदणीसाठी दिली आहे. पण थेट 'पीएमएवाय'च्या संकेतस्थळावर नोंदणी करणं अधिक सोपं आणि अधिकृत आहे. त्यामुळे आता याच वेळेत नोंदणी करा, असं आवाहन नोडल एजन्सी कडून करण्यात आलं आहे.


म्हाडाला फटका नाही

यासंबंधी 'पीएमएवाय' नोडल एजन्सीचे प्रमुख म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांना याविषयी विचारलं असता त्यांनी 'पीएमएवाय'ची नोंदणी काही विशिष्ट कालमर्यादेसाठीच होती. ही कालमर्यादा संपल्यानंतर नोंदणी बंद करण्यात आल्याचं 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं आहे. तर याचा कुठेही फटका कोकण मंडळा बसला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा-

गुडन्यूज! २०११ पर्यंतच्या झोपड्यांना अडीच लाखाचं अनुदान

म्हाडाचा रेकाॅर्ड! लॉटरीच्या दुसऱ्याच दिवशी दिलं विजेत्यांना 'ऑफर लेटर'


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा