मुंबई-गोवा महामार्ग जूनपर्यंत 100 टक्के पूर्ण होणार, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहे.
मुंबई-गोवा महामार्गासाठी खूप अडचणी आल्या. पण काळजी करू नका. यंदाच्या जूनपर्यंत हा रस्ता 100 टक्के पूर्ण करणार, असा शब्द गडकरी यांनी मुंबईत बोलताना दिला.
दिल्ली-जयपूर आणि मुंबई-गोवा आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉटस् आहेत. त्यांच्या अडचणी खूप आहेत. कोकणातील सत्य गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला चालणार नाहीत. भावा-भावांमध्ये भांडणे, न्यायालयांत केसेस झाल्या. त्या जमिनींचा मोबदला देता देता पुरेवाट लागली, पण आता त्या समस्या सुटल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. जूनपर्यंत महामार्गांचे काम 100 टक्के पूर्ण होईल, असे गडकरी म्हणाले.