देशातील नामांकीत कंडोम उत्पादक ब्रँड 'ड्युरेक्स' आपल्या ग्राहकांसाठी लवकरच नवे इनोव्हेटीव्ह फिचर्स घेऊन येत आहे. 'रेक्सबाेट' असे या फिचरचे नाव आहे. 'ड्युरेक्स'ने 'फ्युचरिस्टीक टेक्नाॅलाॅजी'त पहिल्यांदाच उडी घेतली आहे. 'चॅटबाेट बँडवॅगन'च्या माध्यमातून फेसबुकद्वारे ग्राहकांच्या मनातील सुप्त इच्छांना मोकळी वाट करून देण्याचा 'ड्युरेक्स' प्रयत्न असेल.
टाॅक बाेट, इंटरअॅक्टीव्ह एजंट किंवा फक्त बाेट असा टेक्नाॅलाॅजीच्या रुपात संवाद साधणारा हा एक कम्प्युटर प्रोग्राम आहे. टेक्स्ट किंवा आॅडियोच्या रुपात हा कम्प्युटर प्रोग्राम समोरच्या व्यक्तीसोबत संवाद साधतो. ही टेक्नाॅलाॅजी प्रामुख्याने ग्राहकांना माहिती पुरवण्यासाठी वापरली जाते. पण पहिल्यांदाच 'सेक्स एज्युकेशन' देण्यासाठी 'ड्युरेक्स' या टेक्नाॅलाॅजीचा वापर करणार आहे.
सेक्स संदर्भातील समस्येबाबत निकटवर्तीय किंवा डाॅक्टरांनाही सांगण्यास अनेकांना शरम वाटते. अर्धवट ज्ञानामुळे समस्या वाढतच जाते, परंतु तिचे योग्य उत्तर मिळत नाही. अशा व्यक्तींना हा प्रोग्राम फायदेशीर ठरू शकतो.
फेसबुकद्वारे लाॅगइन करून किंवा मॅसेंजरद्वारे कुठलीही व्यक्ती सेक्स संदर्भातील प्रश्न विचारून त्वरीत उत्तर मिळवू शकते. प्रश्न आणि उत्तराची देवाणघेवाण केवळ संबंधित व्यक्ती आणि प्रोग्राममध्येच होईल. तिसऱ्या व्यक्तीला याबाबतची कुठलीही माहिती होणार नाही.
तुमचे उत्तर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा - http://M.me/rexbot
हेही वाचा -
डेटवर जाताय? लक्षात ठेवा या ८ गोष्टी
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)