Advertisement

एक्सपायर झालेली ब्यूटी प्रॉडक्ट्सचा 'असा' करा वापर


एक्सपायर झालेली ब्यूटी प्रॉडक्ट्सचा 'असा' करा वापर
SHARES

सुंदर दिसण्यासाठी अनेक मुली ब्यूटी प्रॉडक्टचा वापर करतात. त्वचेचा प्रश्न असल्यानं अशी उत्पादनं घेताना आपण चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्स घेतो. चांगल्या प्रतीची ब्यूटी प्रॉडक्ट्स घ्यायची म्हणजे ती महाग असणारच. त्वचेचा प्रश्न असेल तर कुणी रीस्क घेत नाही. 

पण अनेकदा पैसा खर्च करून घेण्यात आलेली ब्यूटी प्रॉडक्ट्स जास्त वापरली जात नाहीत. एखाद-दुसऱ्या कार्यक्रमासाठी ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. त्यामुळे खूपदा ती वापरली जात नाहीत. वापर नसल्यामुळे अर्थात त्यांची एक्सपायरी डेट संपते. आता एक्सपायर झालेले ब्यूटी प्रॉडक्ट्स तर वापरू नाही शकत. मग अशा वेळी ही ब्यूटी प्रॉडक्टस टाकून देण्याशिवाय काही पर्याय नसतो. पण आम्ही तुम्हाला हे ब्यूटी प्रॉडक्टस पुन्हा वापरात कशी आणायची या बद्दल सांगणार आहोत. 


१) आय शॅडो

आय शॅडो जुना झाला की त्याचे सुकून तुकडे-तुकडे पडतात. एक्सपायरी डेट निघून गेल्यानं त्वचेसाठी हा आय शॅडो वापरू शकत नाही.


त्यामुळे आय शॅडोचे तुकडे पुन्हा एकत्र करून ट्रान्सपरंट नेलपॉलीशमध्ये मिक्स करू शकता. वेगवेगळ्या आय शॅडोचा उपयोग तुम्ही नेलपॉलीश म्हणून करू शकता. 


२) लिपस्टिक

खूप कालावधीपासून न वापरलेल्या लिपस्टिकला वितळवून व्हॅस्लीनमध्ये मिक्स करून त्याचा लीपबाम म्हणून वापर करावा. याशिवाय मार्कर म्हणून देखील याचा तुम्ही वापर करू शकता.


तुम्ही शिवणकाम करताना देखील कपड्यावर मार्कर म्हणून याचा वापर करू शकता. 


३) फेशिअल टोनर


एक्सपायर झालेला फेशिअल टोनर हा क्लिनरप्रमाणे कार्य करू शकतो. याचा वापर करून तुम्ही घरातील काचा, आरसे, टेबल, बाथरूममधल्या टाईल्स स्वच्छ करू शकता.


४) नेलपॉलिश


नेलपॉलिशच्या वापर करून तुम्ही एखादी क्राफ्टमधील वस्तू आणि स्पोर्ट्स शूज रंगवू शकता. याशिवाय तुमच्या घरातील चाव्यांना वेगवेगळ्या रंगानं रंगवू शकता. जेणे करून कुठली चावी कुठल्या लॉकरची असा तुमचा गोंधळ होणार नाही.


५) परफ्यूम


एक्सपायर झालेल्या परफ्यूमला फेकून देण्याएवजी त्याचा वापर रूम फ्रेशनर म्हणून करू शकता. याशिवाय टॉयलेटमध्ये देखील तुम्ही याचा वापर करू शकता. 


६) मेकअप ब्रश


मेकअप ब्रशचा वापर अधिक प्रमाणात केला तर तो हार्ड बनतो. त्यामुळे अशा ब्रशचा मेकअप करताना अजिबात उपयोग होत नाही. मात्र हार्ड झालेला ब्रश तुम्ही की बोर्ड किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू साफ करण्यासाठी करू शकता. 


७) लिप बाम



शूजला शाईन आणण्यासाठी लिप बाम वापरू शकता. याशिवाय घट्ट लागलेली बॅग किंवा पँटच्या चेनसाठी लिप बाम वापरू शकता.  


हेही वाचा

हिवाळ्यात अशी घ्या त्वचा आणि केसांची काळजी

एकाच जागी बसून काम करणं घातक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा