Advertisement

पुन्हा शिवरायांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी नेहमीच रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकरकडे ही संधी पुन्हा चालून आली आल्यानं तो पुन्हा एकदा शिवरायांच्या रूपात दर्शन देणार आहे.

पुन्हा शिवरायांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर
SHARES

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी नेहमीच रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकरकडे ही संधी पुन्हा चालून आली आल्यानं तो पुन्हा एकदा शिवरायांच्या रूपात दर्शन देणार आहे.


रसिकांना प्रभावित केलं

हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळावी असं बऱ्याच कलाकारांना वाटत असतं, पण हे भाग्य फार कमी कलाकारांच्या नशीबी हे सौभाग्य असतं. पूर्वीच्या काळी सूर्यकांत यांनी साकारलेले शिवराय आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. त्यानंतर बऱ्याच जणांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली पण तितकीशी स्मरणात राहिली नाही. अलीकडच्या काळात खासदार डॅा. अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या शिवरायांनी रसिकांना प्रभावित केलं. त्यानंतर गत वर्षी प्रदर्शित झालेल्या  'फर्जंद' या चित्रपटात प्रथमच शिवरायांची भूमिका साकारत लेखक, दिग्दर्शक, गीतकार, अभिनेता चिन्मय मांडलेकरनं रसिकांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं.


फत्तेशिकस्त

आता 'फत्तेशिकस्त' या आगामी मराठी सिनेमात चिन्मयला पुन्हा शिवरायांचं रूप धारण करण्याचं सौंभाग्य लाभलं आहे. 'फर्जंद' चित्रपटाच्या यशानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर महाराजांच्या कुशल युद्धनीतीचं दर्शन घडविणाऱ्या भारतातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'फत्तेशिकस्त' या चित्रपटातून आपल्यासमोर घेऊन येणार आहे. मराठ्यांचे पराक्रमी पर्व शिवाजी महाराजांपासून सुरु होते. 'रयतेचा राजा' किंवा 'जाणता राजा' याबरोबरच महाराजांना 'शस्त्रास्त्रशास्त्र' पारंगत म्हटले जातं. त्यांच्या युद्धनीतीचे धडे जगभरात अनेक देशांच्या सैन्यदलांना दिले जातात. त्यांच्या कुशल युद्ध नेतृत्वाखाली मराठ्यांनी केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची कथा उलगडणाऱ्या 'फत्तेशिकस्त' या ऐतिहासिक चित्रपटाचं पोस्टर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आलं आहे.


सर्जिकल स्ट्राईकचा थरार 

छत्रपती शिवाजी महाराजांनी धैर्यानं, शौर्यानं आणि तळपत्या तलवारीच्या जोरावर हिंदवी स्वराज्याचं तोरण उभारलं. 'आता थेट घुसायचं आणि गनिम तोडायचा...', असं लिहिलेल्या या पोस्टरमध्ये चिन्मयनं साकारलेल्या शिवाजी महाराजांच्या तळपत्या तलवारीचा व त्यांच्या आत्मविश्वासाचा दरारा पहायला मिळत आहे. 'गनिमी कावा'चं तंत्र वापरत छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या आहेत. ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्यानं आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत 'फत्तेशिकस्त' हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. भारतातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार 'फत्तेशिकस्त' चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. 



हेही वाचा -

'विष'मधून अभिनयात एंट्री करणार जसलीन मठरु

ईशान-अनन्याची जमली जोडी




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा